जळगाव

‘महसूल’ विभागाचे डोळ्यासमोर बिनधास्त अवैध वाळू वाहतूक 

अल्हाद जोशी

एरंडोल : तालुक्यात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास व वाळूचोरी रोखण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालून वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रात्रभर वाळूची वाहतूक सुरू असताना महसूल कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

तालुक्यातील उत्राण, हणमंतखेडे, कढोली, रवंजे, रिंगणगाव, दापोरी, टाकरखेडे यासह गिरणा नदीपात्रालगत असलेल्या गावातून दररोज सुमारे ५० वाहनांतून बिनधास्तपणे वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. वाळूचोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सुमारे ५० वाहनांतून वाळू वाहतूक केली जात असताना स्थानिक महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाळू वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरून भरधाव जात असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. 

माफियांविरुद्ध तक्रार करणाऱ्यास धमकी देण्याचा प्रकारदेखील वाढला आहे. आमच्याविरुद्ध कोणाकडेही तक्रार करा, अधिकाऱ्यांचे नंबर आहेत का आम्ही देऊ, आमच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, असे वाळूमाफिया आत्मविश्वासाने सांगत आहेत. शहरासह ग्रामीण भागात अनेक नवीन बांधकामे सुरू असून, वाळूमाफियांकडून ठिकठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले आहेत. 

वाचा- झटपट लाॅटरीच्या नावाखाली सुरू होता सट्टापेढ्यांचा धंदा; ते ही पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर ! 

वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे दलाल दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सायंकाळी सातपासून सकाळी आठपर्यंत वाळूची वाहतूक बिनधास्त सुरू आहे. वाळूचोरीस आळा घालण्यात अथवा कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT