Anjani Dam Anjani Dam
जळगाव

‘अंजनी’चा साठा तीस टक्क्यांवर..पाण्याची समस्या काहीअंशी दूर

Anjani Dam News: एरंडोल शहरासह तालुक्यातील अनेक गावांना अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यामुळे प्रकल्पाच्या साठ्याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले असते.

सकाळ डिजिटल टीम

एरंडोल : पळासदड (ता. एरंडोल) येथील अंजनी नदीवरील अंजनी प्रकल्पाचा (Ajani dam) साठा ३० टक्क्यांवर पोचल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील (rural areas) अनेक गावांची (Village) पाण्याची समस्या (Water problem) दूर झाली आहे. अंजनी नदीच्या उगम क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने साठा होण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे.

(jalgaon district ajani dam thirty percent water storage)


पळासदड येथील अंजनी प्रकल्पातील साठ्यात वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अंजनी नदीच्या उगमस्थानापासून प्रकल्पापर्यंत सुमारे १४ बंधारे असून, हे बंधारे पूर्ण भरल्यानंतर प्रकल्पात पाणी येते. अंजनी नदीवरील सर्व प्रकल्प भरल्यामुळे प्रकल्पातील साठ्यात वाढ होत आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावांना अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यामुळे प्रकल्पाच्या साठ्याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले असते. प्रकल्पातील साठ्यामुळे परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ होते. प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर साठा झाल्यानंतर अंजनी नदीवरील काळा बंधारा आणि डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी आवर्तन सोडले जाते. रब्बी पिकांसाठी आवर्तन महत्त्वाचे असते. अंजनी प्रकल्पातून शहरात पाणीपुरवठा होतो. मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे शहराचा विस्तार वाढत आहे.

तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. प्रकल्पाचे वाढीव उंचीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या तीन गावांच्या पुनर्वसनाची समस्या अद्यापपर्यंत न सुटल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने साठा होण्यास अडचणी निर्माण होतात. प्रकल्पात पूर्ण क्षमतेने साठा झाल्यास एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. अंजनी प्रकल्पास १९७७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, प्रत्यक्ष कामास १९९२ मध्ये सुरवात झाली. त्यानंतर निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. १९९५ पासून कामास गती मिळाल्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.


प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ
सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रकल्पातील साठा संपुष्टात आल्यामुळे प्रकल्पातील गाळ काढला. त्यामुळे प्रकल्पातील साठ्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीस आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर; आधी शहांना भेटले, आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट

PMC Standing Committee : स्थायी समितीचे सदस्य निवडताना भाजपकडून धक्कातंत्राचा वापर; १६ पैकी १३ नगरसेवक उपनगरांमधील

Horoscope: यंदा ३०० वर्षांनंतर १२ दुर्मिळ योग आणि ४ राजयोगांचा महासंयोग; महाशिवरात्रीला या राशींचं नशीब उजळणार!

Valentine's Day Outfit Ideas For Men: नेहमी मुलीच का? मुलांनीही दिसा हटके; 'व्हॅलेंटाइन्स डे' निमित्त ट्राय करा 'हे' हँडसम लुक्स

Hasan Mushrif : 'राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजित पवार एकटेच चर्चा करायचे', भाजपच्या विश्वासाने विलीनीकरण होणार; हसन मुश्रीफांची माहिती

SCROLL FOR NEXT