farmer farmer
जळगाव

कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

सोसायटीचे कर्ज व खाजगी व्यक्तींकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे

अल्हाद जोशी



एरंडोल : सततची नापिकी,आई व वडिलांच्या उपचारावर झालेला खर्च यामुळे कर्ज कसे फेडायचे या आर्थिक विवंचनेत (Economic crisis) असलेल्या 38 वर्षीय युवा शेतकऱ्याने (farmer) कर्जास (lone) कंटाळून गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नागदुली (ता.एरंडोल) येथे घडली.
( lon economic crisis young farmer suicide)

याबाबत माहिती अशी,की नागदुली येथील पिरण बुधा पाटील (वय 38) यांचेकडे तीन एकर शेती होती.पिरण पाटील यांचे आई वडील यांना कोरोना झाला होता.सुमारे एक महिन्यापूर्वी वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर आई कोरोनावर मात करून घरी आल्या होत्या.सततची नापिकी,आई वडिलांच्या उपचारावर झालेला खर्च यामुळे ते तणावाखाली होते.पिरण पाटील यांचेवर सोसायटीचे तसेच खाजगी कर्ज होते.सोसायटीचे कर्ज व खाजगी व्यक्तींकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या तणावाखाली असलेल्या पिरण पाटील यांनी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नागदुली येथे किराणा दुकानात गळफास घेवून आत्महत्या केली.

पिरण पाटील यांचे चुलत भाऊ भूषण हिलाल पाटील हे त्याच्या शेतात गेले असताना अमोल महाजन आणि सतीश माळी यांनी त्याना पिरण पाटील यांनी गळफास घेतल्याचे सांगितले.भूषण पाटील यांनी माहिती मिळताच घराकडे धाव घेतली.गावातील विलास पाटील,अजय पाटील,दीपक कोळी,प्रदीप महाजन यांनी पिरण पाटील यास खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मयात झाल्याचे सांगितले.याबाबत भूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करोत आहेत.मयात पिरण पाटील यांचे पच्छात आई,भाऊ,पत्नी,तीन मुली आणि घटस्फोटीत मनोरून बहिण असा परिवार आहे.

( lon economic crisis young farmer suicide)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025, RCB vs LSG: रिषभ पंतच्या लखनौसमोर आज धडाकेबाज बंगळुरू संघाचे पारडे जड आव्हान, कशी असेल Playing XI

Sports News: टी-२० विश्वकरंडक विजेत्या संजू सॅमसनला ICC पुरस्कार; मार्च महिन्यासाठी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Sports News: १७ वर्षांखालील मुलींचा विजय: महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून मात; ईश्वरी अवसरेच्या अर्धशतकाने महाराष्ट्राच्या जिंकण्याची शर्यत मजबूत

Success Story: वडील वॉचमन, आई शिवणकाम करते; लेकीनं २०व्या वर्षी पूर्ण केलं खाकीचं स्वप्न!

SCROLL FOR NEXT