Jalgaon Government Medical College and Hospital Jalgaon Government Medical College and Hospital
जळगाव

चार महिन्यांनंतर जळगावचे सिव्हिल पुन्हा ‘नॉन कोविड’

Jalgaon Government Medical College and Hospital: पहिली लाट ओसरल्यावर तब्बल नऊ महिन्यांनी १७ डिसेंबर २०२० ला कोरोनाविरहित (नॉन कोविड) करण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Government Medical College and Hospital) चार महिन्यांनंतर पुन्हा ‘नॉन कोविड’ (Non covid) सुविधा गुरुवार (ता. २२)पासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ३२० जणांची तपासणी (ओपीडी) करण्यात आली, तर ३२ जण विविध वॉर्डांत उपचारासाठी (Treatment) दाखल झाले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी २२ जुलै २०२१ पासून रुग्णालय पूर्वीप्रमाणे कोरोनाविरहित उपचारासाठी सुरू करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार सकाळी नऊला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद (incumbent Dr. Jaiprakash Ramanand) यांनी रुग्ण महिलेस केसपेपर देऊन वैद्यकीय सुविधेला प्रारंभ केला.
( four months later jalgaon civil again non covid and patient treatment start )

या सुविधा उपलब्ध
ओपीडीमध्ये नेत्रतपासणी, ईसीजी, मानसोपचार, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, फिजिओथेरपी, कान-नाक-घसा, छातीरोग, रक्ततपासणी, स्त्रीरोग, प्रसूतिपूर्व तपासणी, कुटुंब नियोजन, बालरोग, त्वचा व गुप्तरोग या विभागात तपासणी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याशिवाय फिजिशियन सेवा व प्राणी चावल्यावर द्यावयाचे इंजेक्शन, प्लास्टर व ड्रेसिंग करण्यासाठी, एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन करण्यासाठीदेखील नागरिक आले होते.


अधिष्ठातांकडून आढावा

नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आवारात असणाऱ्या जनसंपर्क कक्षाची मदत होत होती. सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सर्व रुग्णालयांच्या आवारात आणि ओपीडीच्या सर्व विभागांत, वॉर्डांत पाहणी करून डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या वेळी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विलास मालकर, डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते.


पहिल्या लाटेत ९, दुसरीत ४ महिने

कोरोना महामारी मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ५ एप्रिल २०२० ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी घोषित केले. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यावर तब्बल नऊ महिन्यांनी १७ डिसेंबर २०२० ला कोरोनाविरहित (नॉन कोविड) करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर २० मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा रुग्णालय कोविडसाठी राखीव केले. दुसरी लाट ओसरत असून, त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.


अशी आहे प्रवेशक्षमता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व वयोगटांसाठी वॉर्ड ४, ७, ८, ९, १०, १२, १३, एएनसी, पीएनसी, नवजात शिशू आणि अतिदक्षता विभाग अशा सर्व मिळून ३८६ ऑक्सिजन खाटा आहेत.


नागरिकांना २१ विविध विभागांद्वारे वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरवात केली आहे. गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोनाविरहित सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार झाले आहे.

-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

Pargaon POCSO Case: पारगावमध्ये अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विनयभंग; दोन युवकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा, अटक

Anna Bhau Sathe Memorial : अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी दादाभाऊ लोखंडे यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम; विविध संघटनांचा पाठिंबा

Crime News: जेलमधून पळून आलेल्या ‘इक्का’कडून प्रेयसीला इन्स्टाग्रामवर अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या; बेलतरोडी पोलिसांत गुन्हा

Pune Traffic Diversion: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त स्वारगेट–सारसबाग परिसरात शनिवारी वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग व पार्किंगची नवी व्यवस्था

SCROLL FOR NEXT