Hospital
Hospital  Hospital
जळगाव

दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचे कामकाज उद्यापासून सुरू होणार

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Government Medical College and Hospital) बुधवार (ता. २८)पासून चार महिन्यांनंतर कोरोनामुळे (corona) थांबलेले दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) मिळण्याबाबतचे कामकाज अखेर सुरू होणार आहे. दिव्यांग बांधवांची गर्दी टाळण्यासाठी तसेच त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आता टोकन प्रणाली राबविली जाणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद (incumbent Dr. Jaiprakash Ramanand) यांनी दिली.

(jagaon disability certification will start from wednesday civil hospital )


येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळांतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू होत आहे. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात होईल. तपासणीसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.

येथे अर्ज भरा..

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणचीही (रिनिव्हल) लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, दोन पासपोर्ट फोटो, जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. येथील प्रक्रिया झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच तसेच पुढील आठ दिवसांत (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावरून प्रिंट काढून लाभार्थ्याला मिळणार आहे.

अशी राहील टोकन प्रणाली
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कक्ष क्रमांक ११४ बी मध्ये वैद्यकीय अधिकारी कक्षात कर्मचारी उपस्थित असतात. आठवड्यातील सोमवार ते शनिवार असे सहा दिवस (शासकीय सुटी वगळता) कधीही कार्यालयीन वेळेत दिव्यांग बांधव अथवा त्यांचे नातेवाईक संकेतस्थळावरील डाउनलोड केलेला फॉर्म व दिव्यांग बांधवांचे ओळखपत्र दाखवून टोकन प्राप्त करू शकतात. दर बुधवारी २०० दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. एका व्यक्तीस एकच कूपन मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT