जळगाव

श्री संत मुक्ताबाई डिजिटल वारीत 50 लाख भाविकांनी घेतली सहभाग...घेतले लाईव्ह दर्शन !

दिपक चौधरी


मुक्ताईनगर ः महाराष्ट्रातील मानाची पालखी सोहळ्यातील तापीतीर ते भीमातीर श्रीसंत मुक्ताबाई पालखी श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर ३११ वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेने जात असते. यंदा कोराेनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने पायी वारीने न जाता वाहनाद्वारा वारी करण्यात आली. प्रस्थानापासून आगमनापर्यंत संपूर्ण पालखी सोहळ्याचे कार्यक्रम सोशल मीडियाच्‍या माध्यमातून दररोज लाइव्ह प्रसारण होत होते. यात ५० लाखांवर भाविकांनी डिजिटल वारीचा अनुभव घेतला. 


संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे २७ मेस प्रस्थानापासून ते २४ जुलै पालखी आगमनापर्यंत श्री संत मुक्ताबाई पादुकांची नित्यपूजा, अभिषेक आरती, नैवेद्य, प्रवचन, कीर्तन, भजन, भारुड आदी परंपरेच्या सेवांना यूट्यूब चॅनल व फेसबुकवर संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर या पेजवरून लाइव्ह प्रसारण केले गेले. या लाइव्ह डिजिटल वारीचा लाभ दररोज जगभरातील हजारो भाविक घेत होते. दररोजच्या कीर्तन, प्रवचनात मुक्ताबाई फडावरील अनेक कीर्तनकारांनी सेवा दिली.

वारीचे कालखंडात संपूर्ण ५८ दिवसांत ५० लाखांपेक्षाही जास्त भाविकांनी घरबसल्या वारीचा अनुभव घेतला. सोशल मीडिया टीमचे सम्राट पाटील, महंत नितीनदास महाराज, उद्धव महाराज जुनारे, ज्ञानेश्वर हरणे, गणेश आढाव यांचे विशेष सहकार्य लाभले. भाविकांनी मुक्ताई संस्थान सोशल मीडियाला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील व पालखी सोहळाप्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी नेटकरी भाविकांचे आभार मानले. 

संदापन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT