Autorickshaw 
जळगाव

जळगावात आता..ऑटो रिक्षाचालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारणे बंधनकार

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे.

सकाळ वृत्तसेवा


जळगावः
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Sub Regional Transport Office) प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे, अशा सर्व ऑटोरिक्षा (Autorickshaw) चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक (Passenger transport) करताना मीटरप्रमाणे भाडे आकारणे (घेणे) बंधनकारक आहे. प्रत्येक परवानाधारक ऑटो रिक्षाला मोटर वाहन नियमान्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधणकारक असून ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.


एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य आहे. ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.

आठ नोव्हेंबरपर्यंत मिटर बसविणे गरजेचे
सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑटोरिक्षा फेअरमीटर प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटर प्रमाणे भाडे घ्यावे अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.


जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील, तर नागरिकांनी अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२६१८१९ किंवा mh१९@mahatranscom.in या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT