BHR
BHR 
जळगाव

बीएचआर घोटाळा: सुनील झंवरच्या कोठडीसाठी १० मुद्यांचा आधार

रईस शेख

बहुतांश मालमत्ता सुनील झंवर आणि सूरज झंवर, भागीदारी व्यक्तीसह, काही कंपन्या, फर्मच्या नावे विकत घेतल्या आहेत.


जळगाव : बीएचआर घोटाळ्याचा (BHR Scam) मास्टरमाईंड सुनील देवकीनंदन झंवर याला बुधवारी पुणे जिल्‍हा न्यायालयात (Cort) हजर केले. त्याची नऊ दिवसांसाठी पोलिस कोठडी घेण्यात (police custody) आली. त्यासाठी सरकार पक्षाने विविध दहा मुद्यांच्या आधारे कोठडीची मागणी केली. ॲड. प्रवीण चव्हाण यांनी झंवरला जास्तीत जास्त दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, म्हणून युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीश एन. एम. गोसावी यांनी कोठडी सुनावली.


रिमांडसाठी दहा मुद्दे असे...
-सुनील झंवर गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे ८ महिने परागंदा होता. या कालावधीत दिल्ली, गुजरात व मध्य प्रदेशसह इतर राज्यांत आश्रयाला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, याबाबत पुरावे जमविण्यासाठी
-नक्की कोठे कोणाच्या आश्रयाला, कोणाच्या संपर्कात होता, त्या तपासासाठी
-झंवरच्या घरासह कार्यालयीन झडतीत दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तपास पथकाला प्राप्त झाले असून, त्याच्यासमोर उकल करून तपास करण्यासाठी
-बहुतांश मालमत्ता सुनील झंवर आणि सूरज झंवर, भागीदारी व्यक्तीसह, काही कंपन्या, फर्मच्या नावे विकत घेतल्या आहेत. त्यासाठी पैसा सुनील झंवर यांनी पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उर्वरित मालमत्ता विकत घेण्याचे सुनील व सूरज झंवर यांचे नियोजन होते त्या तपासासाठी
-झंवर टेंडरमधील मालमत्ता कोणाच्या सांगण्यावरून व कोणासाठी खरेदी करीत होते, यासाठी आवश्यक असलेला पैसा कसा उपलब्ध केला?
-सुनील झंवर आणि कोठडीत असलेला अवसायक जितेंद्र कंडारे, महावीर जैन व सूरज झंवर अशांनी किती कर्जदाराच्या फाईल एफडी वर्ग करून निरंक केल्या आहेत? कर्जदार व ठेवीदारांबाबत सुनील झंवरकडे चौकशी करण्यासाठी.
-कर्ज निरंक केलेल्या कर्जदार, संशयितांच्या कर्जासह ठेवीदारांची माहिती झंवरच्या कार्यालयातील हार्ड डिस्कमध्ये कशी आली?
-ठेवी वर्ग करून कर्ज निरंक केलेल्या कर्जदार संशयितांचे कर्ज निरंक दाखल्याचे नमुने झंवरच्या कार्यालयातीलील त्याच हार्ड डिस्कमध्ये मिळून आले, त्याच्या चौकशीसाठी.
-कर्जामध्ये ठेवी वर्ग करण्यासाठी ठेवी आणून देणाऱ्या एजंटांच्या नावाप्रमाणे ठेवीदारांची अपडेटेड यादी सुनील झंवरच्या कार्यालयातून जप्त हार्ड डिक्समध्ये मिळाली, त्याच्या तपासासाठी

साईबाबालाही फसवले
सुनील झंवर पाळधीतील साईबाबा मंदिर सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सचिव असून, श्रीसाई मंदिर पाळधी (ता. धरणगाव) यांच्या नावे एक लाख १५ हजार रुपयांचे फ्लोअर क्लीनींग यंत्र खरेदीसाठी त्याने एक लाख पाच हजार ७०० रुपयांच्या ठेव पावत्या बेकायदेशीर वर्ग केल्या आहेत.

टेंडर कोड लिलावापूर्वीच मिळवायचा
पूर्वनियोजित कटानुसार सुनील झंवरने त्यांच्या साथीदारांच्या संगनमताने त्याच्या खानदेश मिल कॉम्पलेक्सच्या कार्यालयात संशयित कुणाल शहा याच्या मदतीने बीएचआर संस्थेचे कामकाज ज्या सॉफ्टवेअरमधून केले जात होते. मालमत्तेच्या लिलावाआधीच तो टेंडर कोड मिळवायचा.

रोकडऐवजी चालवल्या ठेवपावत्या
प्रमुख सूत्रधार सुनील झंवर, त्याचा मुलगा सूरज झंवर यांनी पिंपळे गुरव, निगडी, घोले रोड, पुणे येथील बीएचआरच्या मालमत्ता इतर साथीदारांशी संगनमत करून कवडीमोल दरात खरेदी केल्या आहेत. तसेच मालमत्ता खरेदीची पूर्ण रक्कम रोख भरणे आवश्‍यक असताना, त्यांनी मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT