BJP 
जळगाव

ओबीसी आरक्षणावरुन जळगावात भाजप मोर्चा आक्रमक

आंदोलनात भाजप मोर्यातर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा



जळगाव : ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरून राज्यातील आघाडी सरकारविरोधात ( Government) भाजपने (BJP) राज्यात तिव्र आंदोलन छेडलेले आहे. त्यानुसार जळगाव शहरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आला. यावेळी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेल्याची तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त करत घोषणाबाजी केली.

Against the government

भाजप ओबीसी मोर्चा जळगाव महानगर आणि जिल्हा ग्रामीण तर्फे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सरकार विरोधात घोषणाबाजी

आंदोलनात भाजप मोर्यातर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी आरक्षण सरकारमूळे गेले असल्याचा आरोप यावेळी भाजपतर्फे करण्यात आला.

आंदोलनात हे होते सहभागी..
या वेळी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष रेखा पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT