Girna River Flood 
जळगाव

चाळीसगाव तालुक्यातील २० गावांना पुराचा वेढा;२०० गुरे वाहून गेली

छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे.

भूषण श्रीखंडे

जळगाव ः चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस (Rain) सुरू आहे, यामुळे गिरणा धरणाखालील (Girna Dam) गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर (Flood) आलेला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी काठच्या सुमारे २० गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यात २ व्यक्ती अडकले असून जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयाकडून एसडीआरएफचे पथक (SDRF squad) बचाव कार्यासाठी (Rescue operations) रवाना झाले आहे. तर वाकडी गावातील पुरात सुमारे २०० जनावरे वाहून गेल्याचा अंदाज गावकऱ्यांकडन व्यक्त केला जात आहे.

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोमवारी पाऊस झाला आहे. त्यामुळे तसेच छोटे-मोठे बंधारे पाझर तलाव व (गिरणा धरण वगळता) इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे, सद्यस्थितीत जामदा बंधार्‍यावरून 1500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. दुपारनंतर त्यात मोठी वाढ येऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

नदीकाठच्या गावांना पुराचा इशारा

गिरणा नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला असून भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात दिनांक 31 ऑगस्ट 2021 दुपारनंतर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरी सखल नदीकाठावरील गुरेढोरे, जळतंन सामान, चारा तसेच रहिवास हे तातडीने उंच जागी हलवावे व सावध असावे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे. असे गिरणा पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव इशारा केला आहे.

मन्याड मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला

रोजी मन्याड मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा १०० % झालेला असुन धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मन्याड नदीला जवळपास ५००० क्युसेक्स पर्यंत पुर जात आहे. त्यामुळे मन्याड व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जावू नये इशारा दिला आहे.

या गावांना पुराचा वेढा..

तर अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले आहे.चाळीसगाव शहरातील तितुर नदीसह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने वेढले आहे, अनेक गावांचा संपर्क तुटला

दोनशे गुरे-ढोरे वाहून गेली?

त्यामुळे पंधरा ते विस गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. वाढला आहे. तर वाकडी गावात सुमारे २०० गुरे-ढोरे वाहून गेल्याचा अंदाज आहे. असून अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे जनावरे, शेती औजारे वाहून गेली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT