chor 
जळगाव

चोरटे आले..दारू प्यायले, चोरी नंतर दुकान पेटवून पसार झाले. 

सकाळवृत्तसेवा

जळगाव  : शहरातील शाहूनगर परिसरात आलेल्या शाहूनगर कॉम्प्लेक्‍समध्ये भाटिया आइस्क्रीम व पार्लर दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून आत निवांत दारूचे पेग रिचवुन स्नॅक्‍स वर तावमारला. दारू ढोसल्यानंतर दुकानातूनच सिगारेटही ओढल्या नंतर मिळेल ते साहित्य घेऊन चोरटे पसार झाले. चोरटे एवढ्यावरच न थांबता त्यांनी चोरी केल्यानंतर दुकानाला आग लावून दिली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुकानदार सुरेंद्र नवनीतलाल भाटिया (वय-62 रा. सुयोग अपार्टमेंट) यांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांचे शाहूनगर कॉम्प्लेक्‍समध्ये भाटिया आइस्क्रीम व कोल्ड्रींक्‍सचे दुकान आहे. लॉकडाऊन मुळे दुकान 23 मार्च पासून बंदावस्थेत होते. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी टॉमीने शटर वाकवून आत प्रवेश केला. आत चोरट्यांनी चॉकलेट, कोल्ड्रिंक्‍स व बिस्किटांवर ताव मारला काही माल चोरी करून नेला. 

चोरी पुर्वी दुकाना मद्यप्राशन 
चोरट्यांनी दुकानातील फ्रिजमधून बिसलरी पाण्याची बाटली काढून सोबत आणलेली दारू प्यायले. दुकानातीलच स्नॅक्‍स व सिगारेटचा आनंद घेतला. नंतर मिळेल ते साहित्य काही रोकड चोरून नेली. दुकानावरील मजल्यावर चोरट्यांनी आग लावून पोबारा केला. त्यात कोल्ड्रींगच्या बाटल्या काही कागदाचे खोके, कुलरसह आदी साहित्य जळून खाक झाला आहे.पोलिसांना घटनास्थळी दारूची व पाण्याची बाटली मिळून आली आहे. 

गुरुवारी मध्यरात्री आग लागल्यानंतर चोरटे पसार झाले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास मार्केट समोरील रहिवासी अँड. मंगेश सरोदे यांनी दुकानमालक सुरेंद्र भाटिया यांना फोनवरून दुकानातून धूर निघत असल्याचे सांगितले. भाटिया यांनी दुकानावर येऊन पाहणी केली असता दुकान चोरी व दुकानाला आग लागलेली होती. त्यांनी तातडीने महानगरपालिकेच्या बंबाला बोलावून आग विझविण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT