CORONA 
जळगाव

जळगावः तर..डिसेंबरअखेर कोरोनाची तिसरी लाट

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची जादा गरज भासली होती. यामुळे जिल्ह्यात जवळपास प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आले आहेत.

देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण (Corona Patient) वाढत असल्याने चिंता वाढली आहे. असेच चित्र राहिल्यास डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाची तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिवाळी, पाडवा, भाऊबीजेनिमित्त नागरिक प्रवास करतात. यातून कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भीती व्यक्त केली जातेय.


दोन दिवसांपूर्वीच एरंडोलला एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण झाली. ते कुटुंबीय मुंबई येथे बाधित नातेवाइकांच्या संपर्कात आल्याची ‘हिस्ट्री’ आहे. यामुळे नागरिकांना दिवाळीत नातेवाइकांकडे जाताना कोरोना संसर्गाचे नियम पाळूनच जावे लागेल. रशियात चौथी, पाचवी कोरोनाची लाट आली आहे. संपर्कातूनच तिसरी लाट येईल. ती लाट येऊ नये यासाठी सर्वांना कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. लस घेतली तरच कोरोना संसर्गापासून आपला बचाव होऊ शकेल. यामुळे पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देणे व लसच न घेतलेल्यांना पहिला डोस देणे हे एक आव्हान आरोग्य व जिल्हा यंत्रणेसमोर आहे.

तीव्रता कमी राहील
जिल्ह्यात तिसरी लाट आली तरी रुग्णांनी घाबरून न जाता कोरोनाची तपासणी करणे, गरज पडली तर रुग्णालयात लवकर दाखल होऊन उपचार सुरू केले तर कोरोनावर मात करता येईल. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची जादा गरज भासली होती. यामुळे जिल्ह्यात जवळपास प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आले आहेत. लांट सुरू झाले तर ते लागलीच सुरू केले जातील. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, एवढी यंत्रणा जिल्हा व आरोग्य प्रशासनाने पूर्ण केली आहे. तिसरी लाट येईपर्यंत सर्वच नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले असल्यास तिसऱ्या लाटेचा धोका नाही. ती लाट येऊनही नागरिकांना तिचा फारसा त्रास होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


कोरोनाची तिसरी लाट डिसेंबर, जानेवारीत येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण केले असेल तर तिसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी असेल. आपण ऑक्सिजन प्लांट ठिकठिकाणी उभारले असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असेल.

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक


नागरिकांनी जर लसीकरण करून घेतले तर तिसरी लाट आली तरी धोका नाही. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे. मात्र रुग्ण वाढतील. परदेशात नागरिकांनी लसीकरण केले नसल्याचे तेथे कोरोनाच्या लाटा येत आहेत.
-डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI : रोहित, विराट यांना शेवटची संधी? जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्याची वेळ, ठिकाण अन् Live कुठे पाहाल

Google Gemini Bhaubeej image Prompt: गुगल जेमिनी प्रॉम्प्ट्सने बनवा भावा-बहिणीचे खास AI फोटो

कन्नड आणि हिंदीनंतर थिएटर गाजवणारा कांतारा पार्ट 1 येणार English मध्ये ! 'या' तारखेला होणार रिलीज

Latest Marathi News Live Update : दहिसर पूर्व अंबावाडीमध्ये फटाका फोडण्यावरून तरुणाला मारहाण

Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

SCROLL FOR NEXT