jalgaon corporation jalgaon corporation
जळगाव

अनोखे राजकारण..पत्नी महापौर; पती विरोधी पक्षनेता

अनोखे राजकारण..पत्नी महापौर; पती विरोधी पक्षनेता

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : पती- पत्नी दोघे शिवसेनेतर्फे (Shiv sena) निवडून आले आहेत. आताही दोघे शिवसेना पक्षातच आहेत; पण पत्नी शिवसेनेची महापौर, तर नवरा शिवसेनेचाच विरोधी पक्षनेता आहे. जळगाव महापालिकेतील (Jalgaon corporation) अनोख्या राजकारणाची पहिली महासभा आज (ता. १२) होत आहे. (jalgaon coronation wife mayor and husband Leader of the opposition)

जळगाव महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ता मिळविली. यात शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या. महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होते. महाजन यांचे पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते होते, ते आजही आहेत. त्यामुळे एकाच घरात महापालिकेतील महापौर आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे आहेत. जळगाव महापालिकेत २०१८ ला झालेल्या निवडणुकीत ७५ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला ५७ जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला १५ आणि एमआयएम पक्षाला तीन जागा मिळाल्या. त्यामुळे भाजप सत्ताधारी, तर शिवसेना विरोधी पक्ष होता.

भाजपकडून दावाच नाही

अडीच वर्षांनी महिला राखीव असलेल्या महापौरपदासाठी निवडणूक लागली आणि याच ठिकाणी मोठे उलटफेर झाले. भाजपचे तब्बल ३० नगरसेवक फुटले, तर एमआयएमनेही सेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेकडे सत्ता आली. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन महापौर झाल्या. तांत्रिक बाबीत शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद आहे, त्यामुळे सुनील महाजन हेच विरोधी पक्षनेते आहेत. सत्तांतर झाल्यानंतर जळगाव महापालिकेची पहिली महासभा ऑनलाइन होत आहे. पत्नी महापौर जयश्री महाजन व्यासपीठावर असतील, तर पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते असतील. भारतीय जनता पक्षाने अद्यापही विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT