Vaccination 
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील ५ लाख बालकांना लवकरच मिळणार कोराना लस..

दहा ते अठरा वयोगटातील ज्या बालकांना इतर सह आजार आहेत त्यांना अगोदर लस दिली जाईल.

देविदास वाणी


जळगाव ः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षावरील ७० टक्के नागरिकांचे जिल्ह्यात लसीकरण झाले आहे. लवकरच १० ते १८ वयोगटातील बालकांसाठी कोरोना लसीकरण (Corona Vaccination)रण्याचे काम सुरू आहे. सुमारे पाच लाख बालके या वयोगटातील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक (District Surgeon) डॉ. एन. एस. चव्हाण यांनी ‘सकाळ’ला दिली.


जिल्ह्यात आतापर्यंत २३ लाख ७५ हजार ३६७ नागरिकांना लसीकरण झालेले आहे. आतापर्यंत एकूण बाधीत झालेल्यांची संख्या १ लाख ४२ हजार १०९ आहे. पहिला डोस घेतलेल्यांमध्ये १७ लाख ९० हजार ८९२ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ५ लाख ८४ हजार ४७५ आहे. आतापर्यंत कोरोनाने २५७५ मृत्यू झालेले आहेत.



कोरोनावर लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. यामुळे लसीकरणासाठी सर्वत्र गर्दी होताना दिसते. लवकरच केंद्र शासनातर्फे लहान मुलांसाठीची (१० ते १८ वयोगट) लस दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने वयोगटानूसार माहिती संकलीत करणे सुरू केले आहे. कोणत्या भागात जास्त आहे, कोणत्या भागात कमी संख्या आहे त्यानूसार लसीकरणाचे नियोजन सुरू आहे. सध्या ज्या ठिकाणी केंद्रे आहेत त्याच ठिकाणी लस द्यावयाची की लहान बालकांसाठी वेगळी लसीकरण केंद्रे सुरू करावयाची याबाबत निर्णय होणे बाकी आहे. बालकांच्या वयोगटातील डेटा तयार करून तो केंद्र शासनाला पाठविला जाईल.

सह आजार असणाऱ्यांना अगोदर लस
दहा ते अठरा वयोगटातील ज्या बालकांना इतर सह आजार आहेत त्यांना अगोदर लस दिली जाईल. त्यानंतर इतर बालकांना लस देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र शासनाकडून बालकांसाठीच्या लस उपलब्ध झाल्यास लगेच लसीकरण सुरू होईल. यामुळे बालकांना शाळा, महाविद्यालयात कोरोना संसर्गाचा धोका राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT