जळगाव

गौण खनिजाची जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडून मागविली 5 वर्षांची माहिती !

देविदास वाणी

जळगाव : अवैध गौण खनिज प्रकरणात बोगस पावत्यांसाठी राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला असल्याने संबंधीत दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सुनावणी झाली. यात जिल्हा परिषदकडून 2015 पासूनची माहिती मागविण्यात आली आहे.

जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या नावे असलेल्या बनावट वाळूच्या पावत्या बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुर्‍हा-वराडसीम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली होती.

या प्रकरणात माहिती अधिकारात माहिती मागवूनही संबधित विभागाने माहिती दिली नाही. लघुसिंचन, जलसंधारण, बांधकाम या विभागातील कामे ही बोगस पावत्याप्रकरणी संशयाच्या भोवर्‍यात आहेत. ठेकेदार, शाखा अभियंत्यापासून संबधित विभागाचे प्रमुख, लेखा परीक्षक यांच्यापर्यंत यंत्रणेतील अनेकांचा यात सहभाग आहे. संगनमताने हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करण्यात आलेला आहे. पावतीवर देशाची राजमुद्रा छापलेली असून या बोगस दस्ताऐवजाचा वापर करून शासनाचेच पैसे लाटण्यात आलेले आहेत. या प्रकरणी यंत्रणेकडून आतापर्यंतच संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज होती. परंतु, सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सावकारे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारींनी काढली नोटीस
सावकारे यांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे सुनावणी झाली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या सिंचन अधिकारी यांच्या नावे नोटीस काढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी पावत्या खोट्या असल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या तक्रारदार सावकारे यांनाही उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच 2015 पासूनची जिल्हा परिषदेकडून
मागवली आहे. त्याची माहिती आली कि पुढील निकाल लागेल. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

Multibagger Stock: 17 रुपायांवरून 1166 रुपयांपर्यंत झेप! 3 वर्षांत 6600% रिटर्न; बाजार कोसळत असतानाही हा शेअर तेजीत

SCROLL FOR NEXT