corona corona
जळगाव

जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या सत्तरच्या टप्प्यात

Jalgaon Corona News : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा उतरता आलेख सुरू असून, महिनाभरापासून रुग्णसंख्या अगदीच दहा-वीसच्या टप्प्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव :
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या आता सत्तरच्या टप्प्यात आली आहे. चाळीसगाव वगळता आता जळगाव शहरासह सर्व तालुक्यांत सक्रिय रुग्णसंख्या दहाच्या आत आली आहे. रविवारी नवे चार रुग्ण आढळून आलेत, तर तेवढेच चार रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) झाले. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.

(jalgaon district corona infatuation and active patient is low)

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा उतरता आलेख सुरू असून, महिनाभरापासून रुग्णसंख्या अगदीच दहा-वीसच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या पहिल्या लाटेपेक्षा तिपटीने कमी झाली आहे. रविवारी प्राप्त तीन हजार ७३६ चाचण्यांच्या अहवालात अमळनेर एक व चाळीसगाव तीन, असे अवघे चार नवे रुग्ण आढळून आले. तर तेवढेच रुग्ण बरेही झाले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ६०५ झाली आहे, तर बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ९५३ वर पोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटून ७७ झाली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यातील स्थिती चांगली असताना चाळीसगाव तालुक्यात मात्र दररोज रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळ जळगाव शहर व अन्य सर्व तालुक्यांतील सक्रिय रुग्णसंख्या दहाच्या आत असताना चाळीसगाव तालुक्यात ही संख्या ३९ आहे.

सहा तालुक्यांत शून्य रुग्ण
धरणगाव, रावेर, जामनेर, एरंडोल, बोदवड आणि पारोळा या सहा तालुक्यांमध्ये सद्यःस्थितीत एकही सक्रिय रुग्ण नाही. आगामी २८ दिवस याठिकाणी नवीन रुग्ण आढळून आले नाहीत, तर हे तालुके कोरोनामुक्त होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT