जळगाव

जळगाव जिल्ह्यात संसर्गाची तीव्रता कमी,पण मृत्यूचे भय कायम !

सामान्य रुग्ण दगावण्याचे प्रमाण अचानक वाढले असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे..

सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यांत झपाट्याने वाढलेल्या कोरोना संसर्गाची (Corona infection) तीव्रता काहीअंशी कमी झाली असली तरी दररोजच्या मृत्यूचा (Death) आकडा बघता मृत्यूची दहशत कायम आहे. या दुसऱ्या लाटेत गंभीरच नव्हे तर सामान्य रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी (Inspection specialist) नोंदविले आहे.


(corona infection decreased death increased)

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ( corona second wave) जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू झाली. मार्च व एप्रिलमध्ये संसर्गाची तीव्रता वाढली. दररोज हजार, बाराशेच्या संख्येने रुग्ण वाढू लागले.


वाढीनंतर उतरता आलेख
जानेवारीअखेर तीनशेच्या टप्प्यात असलेली ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एप्रिलमध्ये अकरा हजारांहून अधिक झाली. १८ एप्रिलला जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ८२१ पर्यंत पोचली होती. त्यानंतर दररोजची रुग्णसंख्या स्थिर होऊ लागली व बरे होणारे रुग्ण वाढू लागले.


संसर्ग कमी, मृत्यू अधिक

एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यापासून रुग्ण काही प्रमाणात कमी होऊ लागले. मात्र, एकीकडे रुग्णसंख्या कमी होऊन बरे होणारे रुग्ण वाढत असताना जिल्ह्यात मृत्यूचे सत्र सुरूच आहे. रोज बाराशेवर आढळणारी रुग्णसंख्या आठ-नऊशेवर आली असताना दररोज होणारे मृत्यूची संख्या सरासरी २० कायम आहे.


सामान्य रुग्णही दगावताय
संसर्ग कमी करण्यात काहीसे यश येत असताना मृत्युदर कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ ज्येष्ठ, सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेले व गंभीर रुग्णच नव्हे, तर तरुण आणि लहान मुलांचाही बळी जात आहे. अगदी सामान्य, लक्षणे नसलेले रुग्णही अचानक गंभीर होऊन दगावत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. उलटपक्षी आयसीयू, व्हेंटिलेटरवरील रुग्ण, काही ज्येष्ठ नागरिक बरे होऊन कोरोनामुक्त होत असून, सामान्य रुग्ण दगावण्याचे प्रमाण अचानक वाढल्याचे निरीक्षणही तज्ज्ञांनी नोंदविले आहे.


‘हॅपी हायपोक्सिया’चे बळी
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत बरेचसे रुग्ण ‘हॅपी हायपोक्सिया’चे शिकार होत असल्याचे दिसते. या प्रकारात रुग्ण अगदी सामान्य दिसतो, तो चांगला बोलतो, चालतो. ऑक्सिमीटरवर सॅचुरेशनही नॉर्मल असते. पण अचानक त्याची प्रकृती खालावते. ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी-जास्त होते आणि रुग्णास व्हेंटिलेटर लावण्याआधीच त्याचा मृत्यू झालेला असतो.

(corona infection decreased death increased)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

Sugar Export Ban: निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट: हर्षवर्धन पाटील यांची माहिती; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार!

Premium|AI and Sustainability History : ‘एआय’ आणि शाश्वत विकास; पृथ्वी वाचवणारे अस्त्र की मानवी रोजगारावर कुऱ्हाड?

SCROLL FOR NEXT