covid-19  covid-19
जळगाव

जळगाव जिल्ह्यात पहिल्या, दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या

प्रथमच जिल्ह्यातील १५ पैकी १४ तालुक्यांमध्ये एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही

सकाळ डिजिटल टीम


जळगाव :
जिल्ह्यात कोरोनाच्या (corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेतील (Corona wave) दैनंदिन आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतील (Patient) नीचांकी अर्थात अवघ्या पाच नव्या रुग्णांची रविवारी (ता. ४) नोंद झाली. नव्या बाधितांपेक्षा १२ पट म्हणजे ६० रुग्ण दिवसभरात बरे झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू (Patient Death) झाला. (jalgaon district corona wave first time low number of patients)


जळगाव जिल्ह्यात जूननंतर आता जुलै महिन्यातही कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या वीसच्या आत आढळून येत असून, रविवारी पहिल्या व दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या नोंदली गेली. प्राप्त तीन हजार १४१ चाचण्यांच्या अहवालात जळगाव शहरातील दोन व जामनेर तालुक्यातील तीन, अशा केवळ पाच रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता एक लाख ४२ हजार ३६१ झाली आहे. तुलनेने रविवारी ६० रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ३३५ वर पोचला असून, रिकव्हरीचे प्रमाण ९८ टक्क्यांकडे जात आहे.



१४ तालुके निरंक
दुसऱ्या लाटेत रविवारी प्रथमच जिल्ह्यातील १५ पैकी १४ तालुक्यांमध्ये एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. जळगाव शहर व जामनेर तालुका वगळता अन्य सर्व तालुके निरंक राहिलेत.

१४ महिन्यांनंतर सर्वांत कमी
जिल्ह्यात २९ मार्च २०२० ला जळगाव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिलच्या १७ तारखेनंतर सातत्याने रुग्णवाढ होत गेली. मे ते सप्टेंबरदरम्यान संसर्गाची तीव्रता वाढली. नंतर पुन्हा संसर्ग कमी होऊ लागला. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत स्थिती सामान्य होत गेली. मात्र, पुन्हा संसर्ग वाढून दुसरी लाट वेगाने पसरू लागली. आता मे महिन्यापासून त्यावर पुन्हा नियंत्रण आले आहे. त्यामुळे एप्रिल २०२० नंतर प्रथमच १४ महिन्यांनी दिवसभरात पाच एवढ्या कमी रुग्णांची नोंद झाली.


सर्वांत कमी रुग्णांचे दिवस
२६ जानेवारी २०२१ - ११ रुग्ण
१ जुलै २०२१ - १२ रुग्ण
३ जुलै २०२१ - १५ रुग्ण
४ जुलै २०२१ - पाच रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s Premier League: महिला प्रीमियर लीगचा धडाका आजपासून; डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार पहिला टप्पा !

Tiger Reserve New Rules : आता वाघाचा फोटो काढणं पडणार महागात! ‘या’ व्याघ्र प्रकल्पाने लागू केले कडक निर्बंध, काय आहेत नवे नियम?

Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला ऑफिससाठी पारंपरिक लूक हवाय? काळ्या साड्यांचे हे ७ स्टायलिश पर्याय तुमच्यासाठी ठरतील परफेक्ट

Asaduddin Owaisi : 'ते शरद पवार यांचे झाले नाहीत, मग जनतेचे काय होणार?' खासदार असदुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर थेट हल्ला

SCROLL FOR NEXT