Dam 
जळगाव

जळगावः धरण स्थळावरील पर्यटन केंद्राचा प्रस्ताव लालफितीत

मात्र गेल्या बारा वर्षांत जलसंपदा व पर्यटन विभागाने या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही.

देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात तीन मोठी धरणे (Dam), तर तेरा मध्यम प्रकल्प आहेत. यंदा चांगला पाऊस (Heavy Rain) झाल्याने सर्वच प्रकल्प पाण्याचे तुडुंब भरलेली आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग बाहेर पडण्याचे दृश्‍य पाहणे डोळ्यांचे पारणे फिटणार ठरते. नदीत सोडलेले अथांग पाणी, वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज, धरण सभोवताली व परिसरात सर्वत्र हिरवीगार झाडी, असे निसर्गचित्र सध्या सर्वच धरणांवर पाहायला मिळते आहे. ही धरणे पर्यटनाची स्थळे आहेत, असे असूनही त्याठिकाणी पर्यटनासारख्या (Tourism) सुविधांचा अभाव आहे. येथे पर्यटन स्थळे (Tourism Place) ‘बीओटी’ तत्त्वावर व्हावीत, यासाठी पाटबंधारे विभागाने (Department of Irrigation) दोन वेळ जलसंपदा मंत्रालयात (Ministry of Water Resources) प्रस्ताव पाठविला. मात्र अद्यापही तो मंत्रालयात धूळखात पडून आहे.



जिल्ह्यातील धरणे भरल्यानंतर संबंधित धरण व परिसर पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांची गर्दी उसळते. हे लक्षात घेऊन गिरणा, सुकी, वाघूर धरणाचा परिसर बीओटी तत्त्वावर विकास करण्यात यावा, असा प्रस्ताव येथील पाटबंधारे विभागाने मुंबईला जलसंपदा विभागात आतापर्यंत दोन वेळा पाठविला आहे. मात्र गेल्या बारा वर्षांत जलसंपदा व पर्यटन विभागाने या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही. पर्यटनाबाबत शासनाच्या उदासीनपणा याद्वारे दिसून येतो.
जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील हतनूर धरण, सातपुड्यातील सुकी धरण, उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे गिरणा धरण, जळगाव शहरासह अनेक तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण ही ठिकाणे जळगावमधील पर्यटनासाठी नागरिकांची आवडती ठिकाणे आहेत.



‘बीओटी’वर कार्यवाही नाही
रविवार, सुटीच्या दिवशी या धरणांना भेट देण्यासाठी स्थानिक पर्यटकांची गर्दी होते. गिरणा धरण नाशिकला अधिक जवळ असल्याने नाशिकसह जळगावचे पर्यटक या ठिकाणी जातात. याठिकाणी धरणांजवळ राहण्यासाठी शासकीय रेस्ट हाउस नाही, उद्याने नाहीत किंवा चहा, नाश्त्यासाठी हॉटेलही नाहीत. स्वच्छतागृहे नाहीत. यावर उपाय म्हणून गिरणा, सुकी, वाघूर धरणांच्या परिसराचा पर्यटनासाठी बीओटी तत्त्वावर विकास केला जावा, असा प्रस्ताव गिरणा पाटबंधारे विभागाने २००७ मध्ये पाठविला होता. नंतर २०१२ मध्ये पुन्हा प्रस्ताव पाठविला होता. मात्र त्यावर अद्यापही कार्यवाही नाही. शासनाने धरणांवर पर्यटन स्थळांना मंजुरी देऊन तेथे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी पर्यटकांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT