Heavy Rain
Heavy Rain 
जळगाव

Jalgaon : ‘गुलाब’ चक्रीवादळाने जळगाव जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

देविदास वाणी



जळगाव ः ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या ( Gulab Hurricane) अनुषंगाने ३० सप्टेंबरपर्यंत नाशिक विभागातील जळगावसह काही जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain) होण्याची शक्‍यता असल्याचा इशारा आहे. जळगाव जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ (Red Alert) देण्यात आला आहे. तालुका नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्याबरोबरच नदीपासून सावधान राहावे, सर्व आपत्त कालीन यंत्रणांनी सतर्क (Emergency systems) राहावे. महसुल अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश आज निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिले आहेत.

नदी, धरणे, तलाव असलेल्या भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात. शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सातत्याने संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती द्यावी. विभाग प्रमुख; तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये. नदीपात्रात नागरिकांनी उतरु नये, वाहने, पशुधन सुरक्षितस्थळी ठेवावे.



या गोष्टी करा..
विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया
जागेत असाल, सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्या. घराची
बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओटयावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालु असतील तर ती त्वरीत बंद करा. ताराचे कुंपन, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासुन दुर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.


या गोष्टी करु नका..
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु
नका.शॉवरखाली अंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना
स्पर्श करु नका. विजेच्या गडगडासह वादळी वारे चालु असतांना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहु नका. जर आपण घरात असाल तर उघडया दारातुन अथवा खिडकीतून विज पडतांना पाहू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT