fire audit fire audit
जळगाव

फायर, इलेक्ट्रीक ऑडिट न केल्यास हॉस्पिटलची मान्यता होणार रद्द !

जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त खासगी हॉस्पिटल्सांना नोटीस बजावली आहे.

देविदास वाणी

जळगाव ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यात खासगी ४५ कोविड हॉस्पिटल्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट, ऑक्सिजन ऑडीट करण्याच्या सूचना जिल्हा शल्यकिचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सर्व कोविड हॉस्पिटलला दिल्या आहेत. ऑडीट न केल्यास मान्यता रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नाशिक, विरार, दिल्ली येथे कोविड रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. याची जळगाव शहरासह जिल्ह्यात पुनरावृत्ती होवू नये. यासाठी ऑडीट करण्याबाबतची मागणी होत होती. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त खासगी हॉस्पिटल्सांना नोटीस बजावली आहे. कोविड हॉस्पिटल्सनी फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट, ऑक्सिजनचे ऑडीट करुन त्याची एन.ओ.सी. दोन दिवसात सादर करावी अशा आशय नोटीसीत आहे.

जिल्ह्यातील मान्यता प्राप्त हॉस्पिटल्सना फायर सेप्टी ऑडीट, इलेक्ट्रीकल्स ऑडीट, ऑक्सिजनचे ऑडीट करण्यासंदर्भात वारंवार सुचना देवून पत्र देखील देण्यात आले आहेत. मात्र अद्यापर्यंत एनओसी सादर केलेली नाही. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास संबंधित हॉस्पिटलच जबाबदार राहील असा इशारा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT