Housing project Housing project
जळगाव

लॉकडाउनमुळे ९० टक्के गृहबांधणी प्रकल्प ठप्प

रिअल इस्टेट क्षेत्राला या दुसऱ्या लाटेत मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

सचिन जोशी


जळगाव : पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या ( corona) दुसऱ्या लाटेचा गृहउद्योगावर (Home industry) अधिक परिणाम झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाने लागू झालेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) कामगारांची (worker) कमतरता, मंजुरीसाठी विलंब व बांधकाम साहित्यातील मोठी दरवाढ आदी कारणांनी जवळपास ९० टक्क्यांवर गृहबांधणी प्रकल्प (Housing project) ठप्प झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. (lockdown effect ninety percent housing projects stop )


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने यासंदर्भात केलेल्या पहिल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जारी केले आहेत. त्यातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले असून, रिअल इस्टेट क्षेत्राला या दुसऱ्या लाटेत मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. देशभरातील २१७ शहरांमधून ४ हजार ८१३ विकासकांना या सर्वेक्षणात सहभागी करुन घेण्यात आले होते.

असे आहेत निष्कर्ष...
- ९० टक्के विकासकांनी दुसऱ्या लाटेने या क्षेत्राचे मोठे नुकसान केल्याचे म्हटले आहे.
- ९५ टक्के विकासकांच्या मते रिझर्व्ह बँकेने या क्षेत्राला मदत न केल्यास ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकल्प ठप्प होतील.
- ८३ टक्क्यांपेक्षा अधिक प्रकल्पांवर कामगारांची कमतरता जाणवतेय.

Housing project

ही आहेत कारणे...
कामगारांची कमतरता, आर्थिक अडचणी, ग्राहकांची घटलेली क्रयशक्ती, विविध परवानग्या व मंजुरीसाठी होणारा विलंब, स्टील, सिमेंट व अन्य साहित्याचे वाढलेल्या दरामुळे बांधकामाचा वाढीव खर्च, कर्जाची परतफेड करणे कठीण या कारणांमुळे गृहप्रकल्प अडचणीत आहेत.


गृहउद्योगाबाबत समोर आलेले निष्कर्ष अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे संपूर्ण रिअल इस्टेट व त्यावर आधारित सर्व उद्योग - व्यवसाय, रोजगार अडचणीत आले आहेत. सरकारने या गंभीर परिणामांची दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात.
- हर्षवर्धन पातोडिया, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT