citizens crowd erupted
citizens crowd erupted 
जळगाव

लॉकडाउनची धास्ती..अन्‌ बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडाली  ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः दोन दिवसांनी होणारा कडक लॉकडाउन, किराणा भेटणार नाही, इतर साहित्य तर लांबच यामुळे आज ज्या ज्या आवश्‍यक वस्तू आहे, किराणा याची खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडाली होती. रविवार सुटीचा दिवस असतो, मात्र आज रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती. 

शहरातील डी मार्टसह किराणा माल विक्रीचे सूपरशॉप, विविध ठिकाणी असलेल्या किराणा दुकानात नागरिकांनी सामान करण्यासाठी गर्दी सकाळी नऊपासून झाली होती. काहींनी आठ दिवसात लागणारा किराणा तर काहींनी महिनाभर पुरेल एवढा किराणा घेतला. शहरात सम, विषम तारखांना दूकाना सुरू असतात जी दुकाने सुरू होती त्यात कपडयांसह विविध वस्तूंच्या दुकानांवरही गर्दीचे चित्र होते. 

उद्या (ता.6) गर्दीचा उच्चांक होईल, आपल्याला सामान मिळेल की नाही याची धास्ती घेत आजच नागरिकांनी किराणासह विविध वस्तू खरेदी केल्या. 
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय जिल्हा प्रशासनाकडे नाही. यामुळे मंगळवारपासून (ता.7) सात दिवसांचा लॉकडाउन जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर पालिका क्षेत्रात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.   

काय बंद अन काय सूरू याचीच चर्चा 
गर्दीतही नागरिक परवापासून काय बंद आहे, काय सुरू राहिल. गाडी नेता येणार आहे किवा नाही, नेली तर पोलिस अडवतील, त्यांना काय उत्तरे दयायची याची खमंग चर्चा ऐकायला मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT