Market 
जळगाव

जळगावः बाजारातील मरगळ दुर झाली..दसऱ्याला कोट्यावधीची उलाढाल

यंदा कोरोनामुक्त वातावरण असल्याने ग्राहकांचा सोन्या-चांदीचे दागिने खरेदीसह इतर वस्तू खरेदीला चांगला प्रतिसाद होता.

देविदास वाणी


जळगाव ः विजयादशमी अर्थात, दसरा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. हा मुहूर्त साधत नागरिकांनी सोने, चांदी, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आदींची अक्षरशः लयलूट केली. अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला. सर्व व्यवसायातून सुमारे पाचशे कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी व्यक्त केला.


गतवर्षी कोरोना महामारीचे संकट होते. रोज रुग्ण सापडत होते. यंदा कोरोनामुक्त वातावरण असल्याने ग्राहकांचा सोन्या-चांदीचे दागिने खरेदीसह इतर वस्तू खरेदीला चांगला प्रतिसाद होता. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच सण अत्यंत साधेपणाने व कोरोनाचे नियम पाळून साजरे झाले. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सण-उत्सवही मोठ्या प्रमाणात व कोरोना नियमांचे पालन करून साजरे केले जात आहेत. नवरात्रोत्सव देशभरात मोठ्या चैतन्यमय वातावरणात साजरा झाला.

सोने-खरेदी अन्‌ गृहप्रवेश
विजयादशमीचा मुहूर्त साधत अनेकांनी गृहप्रवेश केला. काहींनी वाहन किंवा सोने व चांदी खरेदीचा मुहूर्त साधल्याने या मुहूर्तावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे वर्षभरापासून या क्षेत्रात कोरोनामुळे निर्माण झालेले सावट काही प्रमाणात कमी झाले. गतवर्षी कोरोनामुळे बंद असलेली सोने-चांदीची दुकाने सुरू होती. मात्र कोरोनाचे त्यावर सावट होते. नागरिक कोरोनाच्या भीतीने सोने, चांदी, नवीन वाहने खरेदीसाठी येण्यास दचकत असत. यंदा मात्र तसे चित्र नव्हते. सकाळपासून सायंकाळपर्यंत सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी झाली. काही महिन्यांपासून सोने-चांदीच्य किमतीत घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांकडून सोने खरेदी केली जात होती. मात्र नवरात्रोत्सव सुरू झाल्याने पुन्हा भाववाढ झाली. मात्र तरीदेखील विजयादशमीचा मुहूर्त साधत अनेकांनी सोने खरेदी केली. त्यामुळे वर्षभरापासून बाजारपेठेत आलेली मरगळ दूर झाली असून, सोने-चांदीच्या बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल झाल्याने सराफ व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

बाजारपेठेत प्रचंड गर्दी
विजयादशमीला घराची आकर्षक सजावट करून घरावर झेंडूची तोरणे लावली जातात. वाहनांनाही सजविले जाते. यामुळे झेंडूला प्रचंड मागणी असते. यंदा झेंडू ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे उपलब्ध होता. त्यामुळे बाजारपेठेत दसऱ्याची खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच प्रचंड गर्दी होती. यासोबतच नवीन कपडे, दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. अनेकांनी अगोदरच वाहनांचे आरक्षण केले होते. ती वाहने त्यांनी मुहूर्त साधत नेली.

मेहरूण चौपाटीवर शुकशुकाट
दर वर्षी शहरातील मेहरूण तलाव परिसरात रावणदहन केले जाते. यंदा सर्व ‘अनलॉक’ असूनदेखील रावणदहन झाले नाही. यामुळे मेहरूण चौपाटीवर शुकशुकाट होता.


कोरोनानंतर सोने-चांदी बाजारपेठेत विजयादशमीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षीपेक्षा यंदा गर्दी होती. तयार दागिन्यांना मागणी अधिक होती. सोबतच सोन्याचे देव-देवतांचे टाक, सोन्याचे वेढे, कलाकुसरीच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती होती.

- मनोहर पाटील व्यवस्थापक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स


नवीन घरांमध्ये तयार घरांना यंदा चांगली मागणी होती. कोरोनामुळे दोन वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकांवर मंदीचे सावट होते. यंदा ते कोरोना नसल्याने दूर झाले आहे. अनेकांनी अगोदरच घरे आरक्षित केली होती. विजयादशमीला त्यांनी त्यात प्रवेश केला.

-अनिस शाह, ‘क्रेडाई’चे राज्य उपाध्यक्ष



दसऱ्याला झालेली विक्री ...

* दुचाकी वाहनांची विकी--११५०
* चारचाकी वाहनांची विक्री--५२५
* तयार घरांची विक्री--२००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

SCROLL FOR NEXT