olx cycle sell  
जळगाव

‘ओएलएक्‍स’वर सायकलचा फोटो टाकताच आला फोन आणि घडले धक्‍कादायक

सकाळ वृत्तसेवा

जऴगाव : ओएलएक्सच्या माध्यमातुन साय़कल विक्री करण्याच्या नादात तरुणाची २८ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. शहरातील भूषण कॉलनीतील सूरज महेंद्र पाटील या तरूणाच्या खात्‍यातून रक्‍कम काढण्यात आली आहे.

सुरज हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने बारा हजार रुपयांची जीम की सायकल खरेदी केली होती. ही सायकल विक्री करायची म्‍हणून त्याने सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ओएलएक्सच्या साइटवर सायकलचे छायाचित्र अपलोड करुन जाहिरात टाकली. 

क्‍युआर कोट केला स्‍कॅन
जाहिरात टाकताच सूरजला राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. त्याने सायकल खरेदी करायचे असून तुम्हाला पाठवलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा; त्यानंतर तुम्हाला संबंधित सायकलची रक्कम मिळेल असे सांगितले. सूरजने क्यूआर कोड स्कॅन करताच त्याच्या बँकेच्या खात्यावरुन अर्ध्यातासाच्या अंतरात दोन वेळा तीन हजार व दोन वेळा ११ हजार याप्रमाणे एकुण २८ हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश मोबाईलवर पडला. यानंतर आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे सुरजच्या लक्षात आल्यावर त्‍याने रामानंदनगर पोलिस स्‍टेशनला तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : पाबे घाट चढताना पावसामुळे कार घसरून दीडशे फूट दरीत कोसळली; तीन जण किरकोळ जखमी, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश; सिंह राशीसह ४ राशींचे नशीब पालटणार! पैसा येणार, रखडलेली कामंही पूर्ण होणार

Mangalwedha News : उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पा बाबत विरोधकाकडून चुकीची माहिती; प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT