Collector Abhijit Raut 
जळगाव

जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे तातडीने बदला- जिल्हाधिकारी

थोर महापुरुषांची नावे किंवा लोकशाही मूल्ये वृध्दिंगत होतील, अशी नावे द्यावीत.

सकाळ वृत्तसेवा



जळगाव ः जिल्ह्यातील गावे (Villages), वस्ती आणि रस्त्यांची (Roads) नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे, वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी आज दिले.



सामाजिक न्याय विभागाने जातीवाचक नावे बदलण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.


जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दीगंत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जाती वाचक असल्यास ती बदलावीत. त्याऐवजी थोर महापुरुषांची नावे किंवा लोकशाही मूल्ये वृध्दिंगत होतील, अशी नावे द्यावीत. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समाजकल्याण विभागाला सहकार्य करावे.


३३ वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३३ जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी बैठकीत दिली. त्यापैकी भुसावळ तालुका-३, भडगाव-१, एरंडोल-३, पाचोरा-७, रावेर-१, जामनेर-१०, अमळनेर-२ या वस्त्यांची माहिती प्राप्त झाली आहे. तर यावल, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, धरणगांव, जळगांव, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : संजू सॅमसन बाकावरच... दुखापतीमुळे भारतीय संघात करावे लागले दोन बदल; भारताने टॉस जिंकला

China Shoe Factory Fire: बूट कारखान्यात भीषण आग! २८ कामगारांचा होरपळून मृत्यू; थरारक व्हिडिओ समोर, कुठे घडली घटना?

Marathi News Updates: राज्यासह देशात विदेशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Maharashtra Rain: पश्चिम घाटात यंदा पावसाचा विक्रम! पहिल्या आठ दिवसांत इतका पाऊस का झाला? हवामान तज्ज्ञांनी सांगितले मोठे कारण

महाराष्ट्रात UCC लागू करण्याची तयारी! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; ७ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन

SCROLL FOR NEXT