Shiv Sena Movement
Shiv Sena Movement 
जळगाव

शिवसेनेच्या महापौर,उपमहापौर यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

जळगावः केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या विरुध्द आक्षेपार्ह विधान केल्याचे पडसाद मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. त्यात जळगाव येथील शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर हल्ला व आंदोलन (Movement) करण्यात आले होते. या प्रकरणी शिवसेनेच्या महापौर, उपमहापौर यांच्यासह २५ जणांवर जमावबंदीचे उल्लंघन करून भाजप कार्यकर्त्यांना (BJP worker) धक्काबुक्की केल्याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात (City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्त्यावरून जळगावात शिवसेनेने मंगळवारी राणेंचा निषेध करून आंदोलन केले. तसेच भाजप कार्यालयावर देखील गोंधळ झाला होता. त्यानंतर शिवसेनेकडून शहर पोलिस ठाण्यात मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढून आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी निषेध करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शहर पोलीस स्थानकात भाजपतर्फे शिवसेनेच्या २५ पदाधिकार्‍यांवर जमावबंदीचे उल्लंघन आणि धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT