जळगाव

आयुक्त साहेब ! दुकाने लावू द्या अन्यथा मुलांना दत्तक घ्या !

भूषण श्रीखंडे

जळगाव ः गेल्या पाच महिन्यापासान हॉकर्सचे दुकाने बंद असल्याने तसेच आता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून वेठीस धरून हॉकर्सवर केली जाणारी कारवाईमूळे सर्व हॉकर्स कर्जबाजारी व त्यांच्या कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दुकाने तरी लावू द्या अन्यथा आमच्या मुलांना दत्तक घ्या अशा घोषणा शिवसेनेचे निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर हॉकर्स व त्यांच्या पाल्यांनी मोर्चा काढला. यावेळी आयुक्तांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. 

जळगाव शिवसेनेचे निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेवर आज सकाळी साडे अकरा वाजता हॉकर्स बांधवावर होणाऱया अन्यायाबाबत आज महापालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी हॉकर्सने महापालिकेच्या आवारात घोषणा बाजी तसेच फलकाद्वारे आम्हाला दुकाने लावू द्या अन्यथा आमचे मुले दत्तक घ्या अशी मागणी प्रशासनाला केली. तसेच आयुक्त सतिष कुलकर्णी यांना निवेदन देवून हॉकर्सला दुकाने लावू देण्याची विनंती करून चर्चा केली. यावेळी उपायुक्त संतोष वाहुळे देखील उपस्थित होते. 

पर्यायी जागा उपलब्ध देवू- आयुक्त
अनेक रस्त्यावर नो हॉकर्स झोन असून विक्रेते व हॉकर्सच्या दुकानांमुळे रस्त्यांवरील वाहतुक विस्कळीत होते. त्यामुळे ही कारवाई करावी लागत असून  हॉकर्ससाठी आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून देणार आहोत असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले.

हॉकर्स नेहमी वाऱयावर
निवडणूकांच्या वेळीस काही नेत्यांनी हॉकर्सचा वापर करून तुमच्या सोबत असल्याचे सांगून प्रश्‍न मार्गी लावू असे आश्‍वासन हॉकर्सला दिले. परंतू दोन ते तिन वर्ष उलटत आली तरी त्यांचा प्रश्‍न अजून सुटला नाही. कोरोनाच्या महामारीमुळे आता परिस्थीती सुरळीत आहे त्यात महापालिकेकडून क्रुर पद्धतीने हॉकर्सवर कारवी केली जात आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले असून त्यांनी पर्यायी जागा लवकर देण्याचे सांगितले आहे असे शिवसेनेचे निलेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

Aadul Rain : आडूळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान

Ambad lightning : अंबड शहरासह परिसरात वादळ, वाऱ्यासह गारा; वीज पडुन दोन युवकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT