corona vaccination
corona vaccination 
जळगाव

लशीं अभावी..जळगाव जिल्ह्यात ५ वेळा लसीकरण केंद्र बंद

देविदास वाणी

जळगाव ः केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यात येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. मात्र लशीचा पुरवठाच नसल्याने महिनाभरात तब्बल सहा वेळा लसीकरण केंद्र बंद करण्याची नामूष्की आरेाग्य प्रशासनावर आली. पालकमंत्र्यांनी जर दांडगा पाठपुरावा केला असता तर लसी जिल्ह्याला मुबलक उपलब्ध असत्या केंद्र बंदच झाली नसती. मात्र त्यांनी का लशी उपलब्ध करण्यावरून का चूप्पी साधली आहे ? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

जिल्ह्यात एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तीसाठी लसीकरण सुरू झाले. महिन्याभरात जिल्ह्यातील १४ लाख २२ हजार लाभार्थींना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडे होते. मात्र महिन्याभरात तब्बल ५ वेळा लसीकरण केंद्र लशींअभावी बंद करावे लागले आहे. जिल्ह्यात १११ लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू होते.

नियोजन योग्य पण...

लसीकरण केंद्र व उपक्रेंद्रावर एक परिचारिका (नर्स) व सहाय्यक असा स्टाफ आहे. हे कर्मचारी दिवसाला शंभर ते २०० याप्रमाणे १५ ते २० दिवसांत एक हजार ५०० ते दोन हजार नागरिकांना लसीकरण करतील. या मोहिमेत शंभर टक्के लसीकरणासाठी महिनाभराचा कालावधी लागणार होता. लसीकरणाचे योग्य नियोजन आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाने केलेले असताना लसींचा हव्या त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. यामुळे एक महिन्यात होणारे लसीकरण किती काळ चालेल हेही सांगणे आता कठीण असल्याचे विदारक चित्र आरोग्य विभागाचे आहे.

लसींचा अपुरा पुरवठा

जिल्ह्यात सद्य:स्थितीत लसीकरण मोहीम महापालिका, पालिका रुग्णालयांसोबत ग्रामीण भागात शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १२९ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. मात्र या केंद्रावर लसींचा अपुरा पुरवठा होतो. आज सकाळीपासून सर्वच केंद्रावरील लसी संपल्याने केंद्रेच बंद होती. अनेक ज्येष्ठ नागरिक उन्हात लसीकरण केंद्रावर जात होते. मात्र लसी उपलब्ध नसल्याने त्यांना लस न घेता परतावे लागले होते.

एक तारखेनंतर केंद्रावर गोंधळाचा धोका ?

आताच ४५ वर्षावरील नागरिकांना लसी मिळत नाही. दुसरीकडे १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण होणार आहे. त्यावेळी लसीं घेण्यासाठी प्रचंड रांगा लागणार आहे. अन मध्येच लसी संपल्यातर युवा वर्ग गोंधळ नक्की करेल. एकतर कोविन ॲपवर त्यांनी नोंदणी वेळ घेतली असेल. अन त्यावेळी जर लस उपलब्ध झाली तर गोंधळाची स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

अशी आहे आकडेवारी

* ४५ वर्षावरील लसीकरणाचे लाभार्थी--१४ लाख २२ हजार

* प्रत्यक्षात लस घेतलेले लाभार्थी-- ३ लाख ३६ हजार

* लशीं अभावी बंद लसीकरण केंद्र-१११

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT