crime crime
जळगाव

कौटुंबिक वाद..आणि मेहुण्याने शालकाला झोपेत संपवीले!

रात्री आईला जाग आली पाहिले असता मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातलेला दिसला.

दीपक चौधरी


मुक्ताईनगर ः येथील तरुणांची (young man) डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज दि 16 रोजी उघडकीस आली असून पाहुण्याने शालकाचा खून (Murder) केल्याचं संशय असल्याचे समजते थरारक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (muktainagar city sisters husband kill by young man)



याबाबत वृत्त असे की, शहरातील भुसावळ रोडवर कोर्टाजवळ सेवानिवृत्त शिक्षक वामन ठोसरे राहतात त्याचा मुलीचा सुमारे चार वर्षांपूर्वी चुंचाळे (ता. यावल) येथील विजय सावकारे याच्याशी लग्न झाले होते. मात्र यानंतर त्यांचे कौटुंबिक वाद झाले होते. तथापि, अलीकडे सलोखा होऊन त्याची बहिण सासरी नांदत होती.


सासूरवाडीला आला आणि गोंधळ घातला
काल रात्री विजय सावकारे हा सासूरवाडीला आला. येथे त्याने गोंधळ घातला. मात्र हा वाद मिटल्यानंतर वामन ठसरे यांचा मुलगा विशाल ठोसरे हे आपल्या पाहुण्यासोबत झोपले होते. दरम्यान, आज पहाट विशाल ठोसरे यांच्या आईला जाग आली असता त्यांना आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातले असून यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसले. त्यांनी घरातील इतर मंडळीला उठविले. विशाल ठोसरे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. तर, विजय सावकारे हे घरात आढळून न आल्याने त्यांनीच हा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी पोलिसांची धाव

या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. शेवटचे वृत्त आले तोवर या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT