Accident 
जळगाव

नंदुरबारःशहादा येथील तरुणाचा पुणे येथे अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा


कळंबू :
शहादा येथील चंद्रकांत माणिकराव महाले यांचे लहान चिरंजीव शुभम महाले यांचे पुणे येथे अपघाती (Accident) निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक करण्यात येत आहे.


सारंगखेडा ता. शहादा येथील चंद्रकांत माणिकराव महाले ह. मु. ( शहादा ) गणेश नगरातील रहिवासी चंद्रकांत महाले यांचे चिरंजीव शुभम महाले हे नोकरीनिमित्त पुणे येथे होते. नेहमीप्रमाणे ता. १७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान मित्रासोबत दुचाकीने कामावरून घरी येत असतांना मंचर ( पुणे) रस्त्यावर कंटेनेरने धडक दिल्याने शुभम महाले यांना गंभीर दुखापत होऊन जागीच गतप्राण झाले तर सोबत असलेले मित्र प्रेमसिंग गिरासे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे कळते, मयत शुभम महाले यांनी बी. एस. सी. ऍग्री चे शिक्षण लोणखेडा ता.शहादा) येथे पूर्ण करून पुणे ( मंचर) येथील बिग बास्केट कंपनीत नोकरीला होता.

शुभम ची ओळख नातेवाईक व शाळेत अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभाव म्हणून होती. शुभम मयत झाल्याची वार्ता गाव परिसरात वाऱ्यासारखी पसरातच कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवारामध्ये आक्रोश झाला. गुरुवारी पुणे येथून मयत शुभमचे पार्थिव रूग्णवाहिकेने शहादा येथील गणेश नगरातील निवासस्थानी आणून तेथून शहादा येथील स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय मन सुन्न करणारी घटना घडल्याने उपस्थितीताचे डोळे पाणावले. शुभमच्या पच्यात आई, वडील मोठा भाऊ, काका असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT