जळगाव

धान्य खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्या;भाजप किसान मोर्चाची मागणी

सकाळ वृत्तसेवा


यावल :
तालुक्यातील शेतकऱ्यांना (Farmers) शासनाच्या (government Under the scheme) किमान रब्बी हंगाम २०२१ च्या ज्वारी व मक्याचे आधारभूत खरेदी किमत योजनेंतर्गत धान्य खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) किसान मोर्चाने केली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष कृषिभूषण नारायण चौधरी यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार महेश पवार यांना निवेदन दिले. (increase grain purchase objectives bjp demand)

शासनाच्या किमान आधारभूत खरेदी किमत योजनेंतर्गत यावल तालुक्यातील रब्बी हंगाम ज्वारीसाठी १४ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांची हेक्टरी २१.९५ क्विंटल प्रमाणे ४६९ क्विंटल खरेदी होणे अपेक्षित आहे. मक्याची तालुक्यातून १५४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यास त्यांची हेक्टरी ४० क्विंटल प्रमाणे ८ हजार ९२४ क्विंटल खरेदी होणे अपेक्षित आहे. पण शासनाकडून यावल तालुक्यासाठी ज्वारी खरेदीचे १०० क्विंटलचे व मका १२०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. म्हणजेच ३६९ क्विंटल ज्वारी व ७७४ क्विंटल मका यावल तालुक्यातील शेतकरी खरेदीपासून वंचित राहतील. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

खरेदीचे उद्दिष्टे वाढवावे..

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने त्वरित ज्वारी व मका खरेदीसाठीचे वाढीव खरेदी उद्दिष्टचे आदेशित करावे. जेणेकरून पाऊस सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या धान्याचे मोजमाप वेळेत व विहीत मुदतीत पूर्ण होईल, असा योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी तहसीलदार पवार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

हे उपस्थित..

जिल्हाध्यक्ष कृषिभूषण तथा बाजार समितीचे माजी सभापती व संचालक नारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सागर महाजन, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक, शहरध्यक्ष नीलेश गडे आणि परेश नाईक यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. या प्रसंगी नायब तहसीलदार आर. डी. पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sitapur Murder Case: चिमुरड्यांना छतावरून फेकलं, आईवर झाडली गोळी अन् बायकोला हातोड्यानं..; सीतापुरात 5 जणांची निर्घृण हत्या

SEBI Bans: सेबीची मोठी कारवाई! कंपनीवर घातली बंदी; गुंतवणूकदारांनाही दिला सल्ला, काय आहे प्रकरण?

James Anderson Retirement : ब्रेंडन मॅक्क्युलममुळे इंग्लंडची 41 वर्षाची तोफ थंडावणार, जेम्स अँडरसन कसोटीतून निवृत्त होणार?

Orry: एक फोटो काढण्यासाठी अन् इव्हेंटला हजेरी लावण्यासाठी किती घेतो मानधन? ओरीनं अखेर सांगूनच टाकलं

Narhari zirwal: झिरवाळांकडून महायुतीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या व्यासपीठावर हजेरी

SCROLL FOR NEXT