MLA Suresh Bhole
MLA Suresh Bhole esakal
जळगाव

MLA Suresh Bhole : महापौरांनी विकासाकडे लक्ष द्यावे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरात रस्ते, साफसफाईसह अनेक समस्या आहेत. त्यामुळे जनता त्रस्त आहेत. महापौर जयश्री महाजन यांनी प्रशासनाकडून ही कामे कसे होतील, याकडे लक्ष द्यावे. केवळ टीकेचे राजकारण करू नये, असे आव्हान आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

शहरातील प्रश्‍नासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे मनपातील गटनेते भगत बालाणी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, राजेंद्र पाटील, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते. (Mayor should pay attention to Development MLA Suresh Bhole should Coordinate Guardian Minister Regarding funds Jalgaon Political News)

आमदार सुरेश भोळे म्हणाले, की पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी निधी रोखला म्हणणे योग्य नाही. महापौरांनी त्यांच्याशी समन्वय साधून निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे. त्यांनी टीकेचे राजकारण न करता समन्वयाने काम करावे. आपणही त्यांना आवश्‍यक तेथे निधीसाठी मदत करण्यास तयार आहोत. त्यांनी शहरातील जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे.

प्रशासनावर वचक आवश्‍यक

महापालिका प्रशासन शहरातील कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहराच्या विकासासाठी सत्तातंतर करून महापौरपद मिळविले. मात्र, विकासाकडे त्या दुर्लक्ष करीत आहेत. सत्ताधारी म्हणून त्यांनी प्रशासनावर वचक ठेवणे गरजेचे आहे. आज शहरातील रस्त्यांच्या समस्येवर नागरिकांना उपोषण करावे लागत आहे. साफसफाई होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. जनतेच्या सहनशीलतेचा अंत होण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे महापौरांनी प्रशासनाच्या कारभाराकडे लक्ष देऊन त्यांच्याकडून विकासाची कामे करून घ्यावीत.

शासनाकडून निधी आणूच

जळगाव शहरासाठी यापूर्वी आम्ही निधी आणला आहे. आताही निधी उपलब्ध करून घेतला आहे. आवश्‍यक असेल, तर आणखी निधी आणणार आहोत, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, की हुडको, जिल्हा बँकेची कर्जमुक्ती आम्ही केली. याशिवाय अमृत, भुयारी गटारी, समांतर रस्ते, स्वच्छ भारत अभियानासाठी आम्ही निधी आणला. शिवाजीनगर पूल, पिंप्राळा उड्डाणपूल, मेहरूण तलावाच्या सुशोभीकरण आदी कामांसाठी आपण शासनाकडून निधी उपलब्ध केला आहे. शासनाकडे आपण आणखी निधीची मागणी केली आहे. तो आपण आणणारच आहोत. महापालिकेत वाटेल तेथे आपण मदत करण्यास तयार आहोत.

४२ कोटींतून आठ कोटी प्राप्त होणार

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी ४२ कोटींच्या निधीबाबत ते म्हणाले, की निधीतून मक्तेदारास अगोदच पाच कोटी रूपये देण्यात आले आहेत. आता पुन्हा आठ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. त्याबाबत निर्णय झाला आहे. लवकरच तो निधी महापालिकेत येणार आहे. त्यामुळे मक्तेदाराने आता रस्त्याची कामे वेगाने करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT