Blue Jacket- Gaurav Kailas Chavan Black T-shirt-Deepak Bhavlal Nannavare Blue Tshirt-Umesh Vinod Chavan Checks Shirt -Vinayak Shere esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम साहित्य चोरून विकले भंगारामध्ये

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चिंचोली (ता. जळगाव) शिवारातील सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणच्या मोकळ्या जागेत ठेवलेले बांधकाम साहित्य शनिवारच्या (ता. ९) पूर्वी चोरीला गेले.

एमआयडीसी पोलिसांनी चार भामट्यांची टोळी चोवीस तासांमध्ये अटक करत भंगारातून विकलेले साहित्य उघडकीस आणले.(Medical college construction material stolen and sold in scrap jalgaon crime news)

इमारतीच्या बांधकाम परिसरातून स्केअर ट्यूब, इंडियन चॅनल, स्टील रॉड असे जवळपास लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेले. भांडारपाल नितीन धाईतकड यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी अल्ताफ पठाण यांच्यासह पोलिस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना एका भंगार व्यावसायिकाकडे लाखोंचे साहित्य तीन तरुणांनी विक्रीला आणल्याची माहिती पथकाला मिळाली.

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे, अल्ताफ पठाण, योगेश बारी, सचिन पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी हे भंगार व्यावसायिकाच्या दुकानात दाखल झाले. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे चोरीला गेलेले साहित्य त्यांना आढळून आले.

भंगार व्यावसायिक विनायक प्रकाश शेरे (वय २९ रा.सुप्रीम कॉलनी) याची चौकशी केली असता, त्याने हे साहित्य गौरव कैलास चव्हाण (वय १९, रा.मोहाडी), दीपक भावलाल नन्नवरे (वय २७, रा. मोहाडी), उमेश विनोद चव्हाण (वय २५, रा.उमाळा संभाजी चौक) या तिघांनी २५ हजार रुपयांमध्ये विकल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिस पथकाने तिघांचा शोध घेत त्यांना अटक केली. अटकेतील संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा माल पोलिसांनी जप्त करीत संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT