President Aniket Patil speaking at the general meeting of The Jalgaon People's Bank on Sunday. Director present along with Dr. C. B. Chaudhary, Chandan Attarde, Executive Director and CEO Rohit Bhujbal, Director Bhalchandra Patil and other directors. esakal
जळगाव

Jalgaon News : अंजनगाव सुर्जी नागरी बँकेचे जळगाव पीपल्समध्ये विलीनीकरण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) च्या अंजनगाव सुर्जी नागरी सहकारी बँक लिमिटेड या बँकेचे दि जळगाव पीपल्स बँकेत विलीनीकरण करण्याचा ठराव पीपल्स बँकेच्या रविवारी (ता. ३) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.(Merger of Anjangaon Surji Nagari Bank with Jalgaon Peoples bank jalgaon news)

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्ष अनिकेत भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित भुजबळ यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनांचे वाचन केले.

बँकेने नुकतीच दि अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही बँक यशस्वीरीत्या विलीन करून घेतली असून अकोला व अकोट या दोन शाखा कार्यरत झाल्या आहेत. याबद्दल बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी अंजनगाव सुर्जी नागरी सहकारी बँक लिमिटेड या बँकेचे दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण करण्याच्या योजनेस मान्यता देणे व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडे सदर विलीनीकरणाच्या मसुद्याचा प्रस्ताव सादर करणे आणि बँकेचे प्रबंध संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत आवश्यक कार्यवाहीचे अधिकार प्रदान करणे असा ठराव मांडला.

या बँकेचा ‘ड्यू-डिलीजन्स रिपोर्ट' पुण्याच्या एस. डी. मेडडकर आणि कंपनी यांचेकडून करून घेतल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार या विषयाला सर्व सभासदांतर्फे एकमताने मंजुरी देण्यात आली. बँकेचे संचालक चंदन अत्तरदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT