midc 750 acre site for MIDC to be decided soon jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon MIDC : एमआयडीसीसाठी 750 एकर जागा निश्‍चिती लवकरच; बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील नवीन उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी कुसुंब्याजवळ साडेसातशे एकर जागेत नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) उभारण्यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी येत्या आठवड्यात जागा पाहणी करून अहवाल सादर करतील. (midc 750 acre site for MIDC to be decided soon jalgaon news)

यासह एमआयडीसीचे स्वतंत्र विभागीय कार्यालय जळगाव येथे सुरू करण्यात येणार असून, कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलसाठी आवश्यक ५ एकर जागा एक महिन्यात निश्‍चित केली जाईल, असे निर्णय गुरुवारी (ता. ९) मुंबईच्या उद्योग विभागात झालेल्या बैठकीत घेण्यात आले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या बैठकीनंतर त्यातील निर्णयांबाबत माहिती दिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या एक्सप्रेस टॉवर येथील कार्यालयात ते स्वत: ऑनलाईन सहभागी झाले.

आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. आमदार सुरेश भोळे यांनी उद्योजकांचे प्रश्‍न तातडीने निकाली निघावेत व यात कुचराई करण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी केली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी उद्योग मित्र समितीच्या बैठका नियमित घेतल्या जातील, असे सांगून कामगार विमा योजना हॉस्पिटलसाठी जागेचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

गाळ्यांच्या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

दुकानगाळ्यांच्या भाड्याचा प्रश्‍न, दुहेरी कर आकारणी व अन्य धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. बैठकीतील चर्चा व कार्यवाहीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षेखाली १५ दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे ठरले.

यांनी मांडले प्रश्‍न

औद्योगिक व व्यापारी संघटनांतर्फे संगीता पाटील, महेंद्र रायसोनी, नितीन इंगळे, किरण बच्छाव, अरविंद दहाड, दिलीप गांधी, किरण राणे, सचिन चोरडीया, सुयोग जैन, रूपेश शिंदे, राजेंद्र चौधरी, महेंद्र सोनार, रमेश शिंदे, संजय जैन यांनी या वेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेऊन विविध प्रश्‍न मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT