Millions of liters of alcohol were destroyed in joint operation jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : लाखो लिटर दारू रसायन संयुक्त कारवाईत नष्ट; जिल्‍हाधिकाऱ्यांचे विशेष आदेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत जिल्‍हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांना जिल्ह्यातील अवैध दारु अड्ड्यांवर कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोलिस व राज्य उत्पादन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने लाखो लिटर दारूचे रसायन नष्ट करत १२ संशयीतांना अटक केली आहे. (Millions of liters of alcohol were destroyed in joint operation jalgaon news)

जळगाव जिल्हा पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध दारु भट्ट्यांवर कावाई मोहिम राबवली जात असून, शुक्रवारी (ता. १८) एकाच दिवशी जिल्हाभरात एकूण ६५ ठिकाणी केलेल्या संयुक्त कारवाईत एकूण ३ लाख ९६ हजार ८५ रुपयांचे २५ हजार २५६ लिटर कच्चे रसायन व ७७२ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु नष्ट केली.

तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात २० ठिकाणी कारवाई करुन एकूण १ लाख ३६ हजार ८०० रुपयांचे १५ हजार २५० लिटरचे कच्चे रसायन व ४४० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु नष्ट केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यात एकुण ८५ ठिकाणी केलेल्या या संयुक्त कारवाईत ५ लाख ३२ हजार ८८५ रुपयांचे ४० हजार ५०६ लिटर कच्चे रसायन व १ हजार २१२ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु नष्ट केली आहे. पोलीस दलाचे ४६ अधिकारी व २२२ पोलीस अंमलदार आणि राज्य उत्पादन शुल्कचे एकूण ६ अधिकारी व २४ अंमलदार यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

एमपीडीएचे प्रस्ताव

गावठी हात भट्टीवाल्यांच्या दाखल गुन्ह्यांचे रेकॉर्डवरुन आजपावेतो पोलीस दलाकडून २ व राज्य उत्पादन शुल्ककडून १ एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन ३ गुन्हेगारांना स्थानबद्ध करुन १ वर्षासाठी कारागृहात रवानगी केली आहे. एमपीडीए कारवाईसाठी इतरही अवैध व्यावसायीक रडारवर आहेत. यामध्ये काहींचे प्रस्ताव तयार असून, स्वाक्षरीच्या प्रतिक्षेत असल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT