Minister Mahajan, MLA Chavan demand fast speed in Shubham Agon murder case esakal
जळगाव

Jalgaon News : शुभम आगोणे खून खटला जलद गती न्यायालयात

मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचारी व चाळीसगाव येथील रहिवासी शुभम आगोणे यांचा किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घृणपणे खून करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचारी व चाळीसगाव येथील रहिवासी शुभम आगोणे यांचा किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घृणपणे खून करण्यात आला होता.

या घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तत्काळ राज्याचे पोलिस महासंचालक व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना फोन करून याबाबत आरोपींविरोधात सक्त कारवाईच्या सूचना दिल्या.

तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. (Minister Mahajan MLA Chavan demand fast speed in Shubham Agon murder case jalgaon news)

या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी व खुनाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती.

तसेच काही दिवसांपूर्वीच मंत्री महाजन व आमदार चव्हाण यांनी शुभम आगोणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते.

तसेच या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या आक्रोश मोर्चात देखील आमदार चव्हाण यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते.

(कै.) शुभमचे वडील अनिल आगोणे हे देखील पोलिस दलातून निवृत्त झाले कर्मचारी आहेत. एक चांगला क्रिकेटपटू असणारा शुभम एक मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक वर्षाचा लहान मुलगा आहे.

एका पोलिसाच्या दिवसाढवळ्या हत्येमुळे सर्व चाळीसगाव तालुका शोकसागरात बुडाला असून, आरोपींविषयी तीव्र संतापाची लाट जनमानसात उसळली होती. शुभमला न्याय मिळावा म्हणून सोमवारी (ता. २२) आक्रोश मोर्चाचे आयोजन चाळीसगाव शहरात करण्यात आले होते.

तपासाला गती मिळणार

या घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना फोन करून याबाबत आरोपींविरोधात सक्त कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

पोलिसांवर असा हल्ला सहन केला जाणार नाही, असा संदेश पोहोचवणे गरजेचे असल्याने आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शुभम आगोणे खून खटला हा फास्ट ट्रॅकवर नेण्यासाठी स्वतः लक्ष घालावे तसेच आरोपींना ‘मोक्का’ लावण्याबाबत देखील त्यांनी पोलिस महासंचालकांना व जिल्हा पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या शुभम आगोणे खून प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT