Gopichand Padalkar  
जळगाव

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात : आमदार गोपीचंद पडळकर

सकाळ वृत्तसेवा

Dhangar Reservation : धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. अनुसूचित जमातीमधून समाजाला आरक्षण निश्‍चित मिळणार आहे. त्यासाठी समाजाने एकत्रित लढा द्यावयाचा आहे, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जळगाव येथे शुक्रवारी (ता. १३) धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

आमदार पडळकर यांनी धनगर जागर यात्रा महाराष्ट्रभर आयोजित केली आहे. शुक्रवारी जळगावात यात्रेनिमित्त ते आले होते. छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुलात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. (MLA Gopichand Padalkar statement Dhangar reservation battle in final stage jalgaon news)

शिवदास बिडगर, सुभाष सोनवणे, सदाशिव ढेकळे, वसंत भालेराव, अरविंद देशमुख, प्रभाकर न्हाळदे, संदीप तेले, सुरेश धनके, दिलीप धनगर, चंद्रशेखर सोनवणे, गणेश बागूल, सुभाष करे, दीपक पाटील, रामेश्वर पाटील, कैलास हटकर, रेखा न्हाळदे, मंजूषा सूर्यवंशी, नानाभाऊ बोरसे, भरत येवस्कर आदी उपस्थित होते.

आमदार पडळकर म्हणाले, की आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. सर्व समाज बांधवांनी एकत्रित लढा द्यावयाचा आहे. आम्ही कोणाच्याही हक्काचे आरक्षण मागत नाही. राज्यघटनेत ३४२ व्या कलमानुसार सादर केलेले अनुसूचित जमातीच्या सूचीत धनगर जमातीचे आरक्षण लागू केलेले असून, त्याची फक्त अंमलबजावणी या सरकारने त्वरित करावी, अशीच आमची मागणी आहे.

घटनेने १९५० पासून आरक्षण देऊनही अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून धनगर समाज वंचित आहे. ११ डिसेंबरपासून तीन दिवस केवळ धनगर समाजाच्या आरक्षणावरच सुनावणी होणार आहे.

आपल्याला विरोबा, खंडोबाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे निकाल आपल्याच बाजूने लागेल, याची खात्री आहे. मात्र समाजासाठी हे तीन महिने महत्त्वाचे असून, समाजाने जागृत राहून एकत्रित लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

काही जण आदिवासी समाजाला फितविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, की आजही ९० टक्के आदिवासी समाज आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे या समाजाला लाभ मिळावा, यासाठी आपण लवकरच आंदोलन उभारणार आहोत.

धनगर समाजास आरक्षण मिळावे, यासाठी आदिवासी समाजही आमच्या सोबत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चंद्रशेखर सोनवणे यांनी न्यायालयीन लढ्याबाबत माहिती दिली. सुभाष सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. वसुंधरा लांडगे, तुळशीराम सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बागूल यांनी आभार मानले. धनगर समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT