MLA Mangesh Chavan inaugurating the renovated police comfort room.  esakal
जळगाव

MLA Mangesh Chavan : सुरक्षेसाठी 100 ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे देणार : आमदार मंगेश चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

MLA Mangesh Chavan : शहराचा विस्तार व औद्योगिकीकरण वाढले आहे. त्यासाठी पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज असून, त्यासाठी त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे.

शहरात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी २०० व पोलिस अधिकाऱ्यांसाठी १८ घरे बांधण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव डी. जी. होशिंग यांच्याकडे प्राप्त झाला असून, त्यावर कार्यवाही होऊन लवकरात लवकर घरे उभारण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. (MLA Mangesh Chavan statement 100 CCTV cameras will be provided for security jalgaon news )

तसेच शहरासाठी अजून १०० सीसीटीव्ही कॅमेरे प्रमुख रस्त्यांवर लावण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आमदार चव्हाण यांच्या निधीतून नूतनीकरण झालेल्या पोलिस आराम कक्षाचे लोकार्पण व शहरातील चार नव्या पोलिस चौक्यांचे भूमिपूजन स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार चव्हाण यांच्या हस्ते आणि पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण झाले. कार्यक्रमास अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष ब्रिजेश पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी आमदार चव्हाण यांनी शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अजून पोलिस चौक्या व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता असेल तर त्यासाठी आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. तसेच

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी येथील शहर पोलिस ठाण्याचे काम अत्यंत चांगले आहे. जनतेचे पोलिसांना सहकार्य मिळाले तर पोलिस आपले काम चोख करू शकतात, असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रास्ताविकात पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गेल्या एक ते दीड महिन्यात शहरातील गुन्हेगारी कमी झाली असल्याचे आणि एकही घरफोडी झाली नसल्याचे सांगितले. त्यामागची कारणे देखील त्यांनी विषद केली.

कार्यक्रमास ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, मेहुणबारे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, सागर ढिकले, विशाल टकले, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, सुहास आव्हाड यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी, कोदगावचे ग्रामपंचायत सदस्य आणि बांधकाम व्यावसायिक भूषण पाटील उपस्थित होते.

पोलिस चौक्यांचे नूतनीकरण

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते खरजई नाका आणि करगाव रोड या ठिकाणच्या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पोलिस चौक्यांच्या नूतनीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर सुरक्षित गाव म्हणून वाघडू या गावालाही पोलिस अधीक्षकांनी आमदार चव्हाण यांच्या समवेत भेट दिली. वाघडू गावात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातले हे पहिले सुरक्षित गाव आहे.

अमोल नानकर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

SRPF Bharti Scam: SRPF भरती परीक्षेत मोठा घोटाळा? ८५ प्रश्न जसेच्या तसे सराव संचातून आल्याने खळबळ, भरती परीक्षेवर प्रश्नचिन्ह!

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Mahindra-PNB शेअर्स चर्चेत; कारण काय? बाजार आणखी कोसळणार?

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT