MSEDCL Mock Drill : शहरातील महावितरणच्या कार्यालयात कोणीतरी पोत्यात मृतदेह टाकून सोडून गेला आहे, असा संदेश सायंकाळच्या सुमारास पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाला अन् सर्वत्र धावपळ सुरू झाली.
पोते उघडले तर काय पोत्यात प्लास्टिक कचरा भरलेला होता. पोलिसांची सतर्कता आणि तत्परता तपासण्यासाठी ते मॉक ड्रिल होते, असे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (Mock drill by police in Mahavitaran office jalgaon news)
पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना खुनाची बातमी कळवताच त्यांनी ताबडतोड उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांना सुभाष चौकाजवळील वीज मंडळ कार्यलयाजवळ बोलावले. डी. बी. पथक, बीट अंमलदार, वाहतूक पोलिस, क्राईम शाखा, गोपनीय शाखा आदी पोलिसांना तत्काळ घटनास्थळी हजर होण्याचे आदेश दिले.
वीज मंडळ कार्यालयात कोणाचा तरी खून करून मृतदेह पोत्यात फेकून देण्यात आला आहे. त्याचा शोध घ्यायला सांगण्यात आले. वीज कर्मचारी आणि अधिकारी गोंधळले. कार्यालयातील इमारतीच्या एका बाजूला लाल डाग पडलेले पोते सापडले. घटनेचे वृत्त समजताच पत्रकार देखील पोहचले होते. सर्वांच्या समक्ष पोते उघडण्यात आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोत्यात प्लास्टिक कचरा निघाला तर पोत्यावर लाल रंग टाकण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांची सतर्कता, तत्परता, संवेदनशीलता आणि गावातील नागरिकांची भूमिका तपासण्यासाठी मॉक ड्रिल असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांना हसू आले. वीज मंडळ कार्यालयात मात्र कोण केव्हा पोते ठेवून गेले हेच माहीत नव्हते.
त्यांनतर सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांची भीती दूर व्हावी आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसावा, तसेच बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शहरातील गांधलीपुरा पोलिस चौकी, मोठी बाजारपेठ, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली मोहल्ला, माळीवाडा, झामी चौक परिसरातून पथसंचलन करण्यात आले.
या वेळी डीवायएसपी नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलिस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख, पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, विनोद पाटील, जाधव आदी अधिकारी, पोलिस कर्मचारी, महिला पोलिस, होमगार्ड आणि तीन आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.