More than 2 crore damages in Raver taluka due to flood jalgaon news esakal
जळगाव

Raver Flood Damage : रावेर तालुक्यात 2 कोटींपेक्षा अधिक नुकसान; गावांमधील 151 घरांची अंशतः पडझड

सकाळ वृत्तसेवा

Raver Flood Damage : जिल्ह्यात बुधवारी (ता. १९) झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका यावल, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांना बसला आहे. रावेर तालुक्यात शेती पिकांचे जवळपास दोन कोटी २९ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

जुलैच्या पंधरवड्यात झालेल्या दमदार पावसाने बळिराजा सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपले.

या पावसाने जनजीवनही विस्कळित झाले होते. यावल, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (More than 2 crore damages in Raver taluka due to flood jalgaon news)

रावेर तालुक्यात घरांसह पिकांचे नुकसान

रावेर तालुक्यात २८ गावांमधील १५१ घरांची अंशतः पडझड झाली असून, पुराच्या पाण्यामुळे ४४२ घरांमधील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात ६२ हेक्टरवरील केळी आणि ४२ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे १४३ शेतकरी बाधित झाले असून, या शेतकऱ्यांचे तब्बल दोन कोटी २९ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागातर्फे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला.

तीन तालुक्यांनी गाठली शंभरी

यावल, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांतील १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. यावल, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांना तर पावसाने अक्षरश: झोडपले होते. अवघ्या दीडच महिन्यात या तिन्ही तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली. त्यामुळे या भागात घरांसह पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

१६ मंडळांना फटका

यावल तालुक्यातील यावल शहर, फैजपूर, किनगाव, भालोद, साकळी आणि बामणोद, रावेर तालुक्यातील रावेर शहर, खिरोदा, खानापूर, सावदा, खिर्डी बुद्रुक, निंभोरा बुद्रुक, ऐनपूर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कुऱ्हा व घोडसगाव या १६ मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने याठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात खिरोदा मंडळात सर्वाधिक १७२ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यात ९३ टक्के पाऊस

जळगाव जिल्ह्यात २६ जूनपर्यंत पाऊस नसल्याने बळिराजा चिंतेत होता. मात्र, जुलैमध्ये पावसाचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले. दीड महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात ९३ टक्के पाऊस झाला. या पावसाने पेरण्यांनीही वेग घेतला असून, आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT