Village farmers attending a meeting held at the Venkatesh Shriram Temple. esakal
जळगाव

Jalgaon News : केळी पीकविमा मिळेपर्यंत पुढाऱ्यांना ‘गावबंदी’; मतदानावरही टाकणार बहिष्कार

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ८१ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा काढला होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ८१ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा काढला होता. मात्र अद्यापपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या विम्याची रक्कम मिळालेली नाही.

सप्टेंबरपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र विमा कंपनीकडून मनमानी कारभार सुरू असून रावेर, मुक्ताईनगर परिसरातील १० ते १५ हजार शेतकऱ्यांना या नुकसानीची रक्कम अद्यापही मिळाली नाही. (More than half of farmers have not received crop insurance amount jalgaon news)

या प्रकरणी राजकीय पदाधिकारी, तक्रार निवारण समिती, प्रशासन व विमा कंपनीदेखील दुर्लक्ष करीत असल्याने या विम्यापासून वंचित असलेल्या तांदलवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.२) सायंकाळी उशिरा तांदलवाडीत व्यंकटेश श्रीराम मंदिरात बैठक घेतली. केळी पीकविमा मिळेपर्यंत तांदलवाडी गावात सर्वपक्षीय पुढारी आमदार, खासदार व मंत्री यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा ठराव संमत केला.

या साठी गावातील सर्व शेतकरी वर्ग आक्रमक होताना दिसून आले. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आम्हाला आता विमा कंपनीवर विश्वास नाही, जर विमा कंपनी आम्हाला विमा देऊ शकत नसेल तर आता २०२३-२४ ला जी रक्कम भरलेली आहे, ती आम्हाला परत पाहिजे असल्याचे सांगितले.

याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता या शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि विमा कंपनीच्या अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून त्यातून मार्ग काढू असे सांगितले.

''केळी पीकविमा मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार करण्यात आल्याचे बैठकीत ठरले. तसेच सर्व पुढारी, खासदार, आमदार, राजकीय पक्षाचे नेते यांना बैठकीत गावबंदी घातलेली असून, गुरुवारी (ता. ४) गावाच्या वेशीवर परिसरातील सर्व शेतकऱ्यांकडून बॅनर लावण्यात येणार आहे.''- अंबर चौधरी, प्रगतिशील शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT