Criminal Mukund Thakur Try For Pre Bail esakal
जळगाव

Crime Update : Most Wanted मुकुंद ठाकूरची अटकपूर्व जामिनासाठी धाव

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील कुख्यात वाळूमाफिया मुकुंद बलविंदरसिंह ठाकूर याच्यातर्फे जिल्‍हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षांपासून फरारी असताना याअगोदर जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला असताना आता नव्याने त्याच्या वतीने जामीन अर्ज सादर करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर उड्डाणपुलावर एका वाळू डंपरचालकाने पोलिस कर्मचाऱ्यास चिरडण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी वाळू ठेकेदार मुकुंद ठाकूरसह डंपरचालक आणि इतरांवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी (२०१६) गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात तब्बल सहा वर्षे ठाकूर फरारी असून, अद्याप जिल्‍हा पोलिस दल त्याला अटक करू शकले नाही.(Most Wanted Mukund Thakur runs for pre arrest bail Jalgaon Crime News)

फरारी असताना ठाकूर आणि त्याच्या टोळीने मिळून कंडारी शिवारातील वनजमिनींचे तुकडे परस्पर विकून कोट्यवधींचा मांजा लाटला. फरारी असताना पाच वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीवरून त्याच्या मध्य प्रदेशातील ठिकाणावर घेराबंदी केली होती. मात्र, तेव्हा तो पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला होता.

लोकांना दिसतो, पोलिसांना नाही

प्राप्त माहितीनुसार वाळूमाफिया मुकुंद ठाकूर त्याच्या व्यावसायिक मित्रांना जळगावात येऊन भेटीगाठी घेतो. गेली सहा वर्षे तो जिल्‍हा पोलिस दलास सापडू शकला नाही. इतकेच नाही तर पोलिसाला चिरडण्याच्या प्रयत्नात फरारी असताना त्याने शासकीय वनजमिनी विक्री केल्याचे गंभीर प्रकरण घडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT