marriage fraud news esakal
जळगाव

Fraud Crime News : घरावरील कर्ज फेडण्यासाठी आईने केली मुलीची ‘विक्री’; लग्नाचे वचन देत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Fraud Crime News : घरावरील कर्ज फेडण्यासाठी बुलढाणा येथील महिलेला सव्वा लाख रुपयांची आवाश्यकता होती.

तीने, जळगावच्या कुसूंबा येथील महिलेच्या माध्यमातून लग्नासाठी इच्छूक तरुणाचा शोध घेत त्याला मुलगी दाखवली. (mother sales her daughter for house loan jalgaon fraud crime )

मुलगी पसंत पडल्याने १ लाख २० हजार रुपये दिल्यावर मुलीचे लग्न करवुन देत तिची आई नांदविण्यास पाठवणार होती. मात्र, पैसे घेवुनही लग्न लावून दिले नाही, म्हणुन मुलाच्या वडीलांनी शहर पोलिसांत तक्रार दिली असून, त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे..

शाहूनगरातील काशीनाथ तुकाराम चौधरी (वय ६३) रिक्षाचालक आहेत. लग्नाच्या वयाचा असलेल्या मुलासाठी ते मुलगी बघत होते. अशातच कुसूंबा (ता. जळगाव) येथील रेखा पृथ्वीराज पाटील यांच्या माध्यमातुन त्यांच्या मुलासाठी मुलगी दाखविण्यात आली.

मुलीची आई देविकाबाई सचिन इंगळे यांनी घरावरील कर्ज फेडण्याच्या बहाण्याने चौधरी यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये रोख मागीतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पैसे दिल्यानंतर पुजा इंगळे नामक तरुणीसोबत मुलाचे लग्न होणार होते. मात्र, पुजाला तिच्या आईने विवाह नोंदणीसाठी पाठवलेच नाही.

तसेच, मुलाकडील मंडळींनी नांदविण्यास पाठवण्याचे सांगितल्यावर उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याची चौधरी यांना खात्री पटली. त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठत शुक्रवारी (ता. ११) तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस नाईक धनराज निकूंभ तपास करत आहेत.

‘रॅकेट’मध्ये सहभाग शक्य

काशिनाथ चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्यानुसार रेखा व तीचा पती पृथ्वीराज पाटील, देवकाबाई ऊर्फ कविताबाई सचिन इंगळे, पुजा ऊर्फ पोर्णिमा सचिन इंगळे अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पैसे घेवुन विवाह लावुन देणाऱ्या रॅकेटमधील हे संशयीत असण्याची शक्यता शहर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT