Archana Rajput esakal
जळगाव

Success Story : वाहकाच्या मुलीची ‘MPSC’त यशाला गवसणी!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या परीक्षेत नगरदेवळ्याच्या अर्चना संदीप राजपूत हिने यश संपादन करत मुलींमध्ये ५१ वा क्रमांक पटकावले.

तिची नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती होणार आहे. (mpsc success story archana rajput Will be Chief Executive of Municipal Council jalgaon news)

अर्चनाचे दहावीपर्यंतचे शिक्षण सरदार एस. के. पवार विद्यालयात झाले. येथे असताना वादविवाद वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत यश संपादन केले होते. आठवीत असतानाच मी राजपत्रित अधिकारी होणार असे स्वप्न बघितले होते. ते सार्थ करण्यासाठी तेव्हापासून तयारीला लागली होती.

दहावीत चांगले गुण मिळविल्यानंतर अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात रसायनशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिची स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होती. दरम्यान, २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेस बसून पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाचोरा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले संदीप पद्मसिंग राजपूत यांना दोन मुली असून, मोठी मुलगी वीज वितरण कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. लहान अर्चना हिने अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटत होते.

परंतु तिला स्पर्धा परीक्षांची आवड असल्याने व तिच्या मनातील असलेली जिद्द व चिकाटी लक्षात घेऊन तिला प्रोत्साहित करण्यासाठी तिच्या आई, वडिलांनी सर्वतोपरी सहकार्य केले. आई, वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत अर्चनाने जे यश संपादन केले ते इतर तरुणाईला प्रेरणादायी ठरेल.

या बाबत अर्चनाने सांगितले, की मी जरी ग्रामीण भागातील असली तरी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास, अभ्यासात असलेले सातत्य, आई वडीलांसह आप्तेष्ट व गुरुजनांकडून मिळालेली प्रेरणा माझ्या यशाचे गमक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT