Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : रस्त्यांची कामे तातडीने करा महापालिका आयुक्तांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील तीन मुख्य रस्त्यांसह ४९ रस्त्याची कामे आपल्या विभागामार्फत करण्यात येत आहेत. मात्र, आजपर्यंत कामाची प्रगती पाहता ते संथगतीने सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

त्यामुळे जनतेची कामे तातडीने करावी, असे पत्र महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.(Municipal Commissioners letter to PWD do road works urgently jalgaon news)

पत्रात म्हटले आहे, की आपल्यामार्फत करण्यात आलेल्या ४९ रस्त्यांच्या कामाची स्थिती अशी दिसून आली आहे.

डब्लूबीएम लेव्हलपर्यंत सुरू असलेली कामे- ०४, एमपीएम लेव्हलपर्यंत सुरू असलेली कामे- ०९, बीएम लेव्हलपर्यंत सुरू असलेली कामे- २७, कारपेट लेव्हलपर्यंत सुरू असलेली कामे- ०४, अद्यापपर्यंत सुरू न झालेली कामे- ०१. तसेच, सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस संपलेले असल्याने कामे करण्यातबाबत मक्तेदारास आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत.

याबाबत आपणास वेळोवेळी पत्र देवून सूचित करण्यात आले असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

तीन प्रमुख रस्ते महत्त्वाचे

शहरातील जिल्हा परिषद चौक ते स्मशानमूमी चौकापर्यंतचा रस्ता, भोईटे रेल्वे गेट ते महेश प्रगती हॉलपर्यंतचा रस्ता व महेश प्रगती हॉल ते सेवामंडळ रस्ता हे शहरातील प्रमुख तीन रस्ते आहेत. ते डांबरीकरणाचे कामही आपल्याकडे आहे.

हे तीनही वर्दळीचे रस्ते असल्याने या रस्त्याची कामे तातडीने हाती घेवून ती पूर्ण करण्यात यावीत. जेणेकरून नागरिकांना वाहतूकीची सुविधा उपलब्ध होईल. दरम्यान, आयुक्त डॉ. गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या या पत्राची प्रत पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही पाठविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT