Sarjeel Syed, Ishtiyak Ali, Salim alias Salya criminals arrested esakal
जळगाव

Crime Update : चोरट्याची आई सोने मोडायला गेली अन्‌ बोंब उठली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील मेहरुण परिसरातील नशेमन कॉलनीत २८ जुलैला घरफोडी झाली होती. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घरफोडीचा उलगडा होणे अशक्य होते.

मात्र, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराची आई सराफ बाजारात सेान मोडायला गेल्याची बातमी लागली अन्‌ घरफोडीचा उलगडा झाला आणि तीन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. (Nasheman Colony Burglary Solved three are shackled due to stolen Mangalsutra jalgaon crime news)

मेहरूणच्या नशेमन कॉलनीत वास्तव्यास असलेल्या मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दिन (वय ५६) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० हजारांची रोकड, तीन ग्रॅमचे कानातील टॉप्स, पाच ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, असा ऐवज दिवसा चोरून नेला होता.

याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू होता. काही केल्या गुन्ह्याचा उलगडाच होत नसल्याने अखेर तांबापुरा भागात अट्टल गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यात आली.

रेकॉर्डवरील इतरही गुन्हेगारांची माहिती काढणे सुरू असताना, अचानक घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील संशयित इश्‍तिायाक अली राजीक अली (वय १९,रा. तांबापुर) याची आई सराफ बाजारात जात असल्याची माहिती निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.

त्यांनी तत्काळ गुन्हेशोध पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, रामकृष्ण पाटील, सुधीर साळवे, मुद्दस्सर काझी, जमीर शेख, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांना कामाला लावले. इश्‍तिायाक अली याचा शोध घेऊन त्याला विचारपूस करण्यात आली.

मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्याने इतर दोन साथीदारांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला अन्‌ पेालिसांच्या तावडीत सापडले.

ओऽ साहेब मी, सुधरलोयं आता...

इश्‍तिायाक अली याला ताब्यात घेतल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. आई सराफा बाजारात चोरीचे सोने मोडायला गेल्याबाबत त्याला सांगताच ‘साहेब मी सुधरलोयं आता’, असे म्हणत त्याने चक्क नकार दिला.

मात्र, त्याला ताब्यात घेतल्याची माहिती कळताच गुन्ह्यातील त्याचे साथीदार सलीम ऊर्फ सल्या शेख कय्यूम (वय २६, रा. बिस्मील्ला चौक, तांबापुरा), सरजील सय्यद हरुन सय्यद (२६, रा. एकता हॉल, मास्‍टर कॉलनी) यांना ताब्यात घेण्यात आले. तिघांना पोलिस प्रसाद दिल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मंगळसूत्र मेाडण्यापूर्वीच ताब्यात
चोरीचे मणी मंगळसूत्र सराफ बाजारात मोडण्यापूर्वीच गुन्ह्याचा उलगडा झाल्याने मंगळसूत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्ह्यातील तिघेही संशयित अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध घरफोडी, हाणामाऱ्यांसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT