Airport Development News
Airport Development News esakal
जळगाव

Jalgaon News : फेब्रुवारीपासून जळगाव विमानतळावरून पुन्हा Take Off

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : उद्योगाच्‍या दृष्‍टीने जळगाव मध्‍य ठिकाण आहे. मात्र, रस्‍ते, रेल्‍वे व विमान सेवेअभावी जळगावातील औद्योगिक विकास त्‍या तुलनेत विकसित झाला नाही. विशेष म्‍हणजे जळगावात विमानतळ तयार असून, विमानसेवा सुरळीत नाही.

यामुळे फेब्रुवारी‍यापासून जळगावसाठी नवीन विमान सेवा सुरू होत आहे. यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चरने पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चरने राज्यातील उद्योजक व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रमांत पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. २२) अध्यक्ष ललीत गांधी जळगावात आले असता, त्‍यांनी याबाबत माहिती दिली. (New flight service to Jalgaon is starting from February Maharashtra Chamber of Commerce Industry and Agriculture taken initiative Jalgaon News)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

‘स्‍टार एअर’ची सेवा

जळगावात नाइट लँडिंगची सुविधा असलेले विमानतळ तयार झाले आहे. मात्र, सुरू असलेली विमानसेवा विस्‍कळित झाली आहे. यामुळे आता ही विमान सेवा पूर्ववत व सुरळीत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चरने पुढाकार घेत ‘स्‍टार एअर’ची सेवा सुरू करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. याबाबत स्‍टार एअरचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्‍याशी बैठक झाली असून, मुंबई, पुणे, अहमदाबाद व इंदूर हे चार पर्याय देऊन फेब्रुवारीत यापैकी एका ठिकाणी सेवा सुरू केली जाणार असल्‍याचे ‘एमएसीसीआयए’चे अध्‍यक्ष ललीत गांधी यांनी सांगितले.

नवीन चार रेल्‍वेलाही थांबे

उद्योगाच्‍या दृष्‍टीने रेल्‍वेची सुविधाही महत्त्वाची आहे. अनेक सुपरफास्‍ट गाड्यांना भुसावळला थांबा आहे. मात्र, जळगावात थांबा नाही. यामुळे रेल्‍वेमंत्री अश्‍वीन वैष्‍णव यांच्‍यासोबत बैठकीत चर्चा केली. त्‍यानुसार पुणे मार्गावरील दुरंतो एक्‍स्‍प्रेस, हमसफर एक्‍स्‍प्रेस, मणिप्रत एक्‍स्‍प्रेस व दानापूर-पुणे या गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत, तसेच जळगावातील रस्‍त्‍यांसंदर्भात राज्‍य सरकारशी चर्चा करून वेगळा निधी आणण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.

महिला उद्योजकता अभियान

उद्योग क्षेत्रात महिलांनाही संधी आहे. या दृष्टीने या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ‘एमएसीसीआयए’तर्फे महिला उद्योजक अभियान राबविले जात आहे. याची सुरवात जानेवारीपासून होत असून, यात महिलांना यंत्रणा उभारणीसाठी प्रयत्‍न केले जातील. त्‍यानुसारच तरुणांसाठी जानेवारीपासूनच उद्योगवृद्धी यात्रा काढण्यात येणार असल्‍याचे ‘एमएसीसीआयए’तर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत गांधी यांनी सांगितले. महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील, मेंबर दिलीप गांधी, नितीन इंगळे या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT