nmu for Ph D student Teaching Associateship Program jalgaon news sakal
जळगाव

Jalgaon NMU News : पीएच. डी.साठी विद्यापीठाची सहयोगी अध्यापक योजना; दरमहा मिळणार 'इतक्या' रूपयांची फेलोशिप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रशाळांमध्ये संशोधन वाढीला लागावे यासाठी पूर्ण वेळ पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहयोगी अध्यापक योजना (टिचींग असोसिएटशिप प्रोग्राम- टॅप) सुरु करण्याचा निर्णय कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी यांनी घेतला आहे. (nmu for Ph D student Teaching Associateship Program jalgaon news)

यापूर्वी संशोधनासाठी विविध वित्तीय एजन्सीकडून अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र आता अर्थसहाय्य तुलनेने कमी दिले जाते. तसेच शिक्षकांची सेवानिवृत्ती, अध्यापक पदांच्या भरतीला असलेले निर्बंध यामुळे संशोधनावर परिणाम झाला आहे. हे संशोधन वाढीला लागावे व पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन आणि संवाद कौशल्य वाढावे, यासाठी सहयोगी अध्यापक योजना (टॅप) सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये प्रशाळांतील नोंदणीकृत आणि नियमित पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळेल. तसेच, प्रशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण संशोधन वाढीला लागेल. या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रुपये फेलोशिप दिली जाणार आहे. प्रारंभी एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या योजनेसाठी संबंधीत विद्यार्थी प्रशाळांमध्ये पुर्णवेळ संशोधन करणारा असावा. त्या विद्यार्थ्याला कोणतेही शासकीय अथवा खासगी संस्थेकडून फेलोशिप नसावी. या योजनेसाठी प्रशाळांमधील संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जांची छाननी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

प्रत्येक प्रशाळांमधून दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा फेलोशिप प्राप्त झाल्यानंतरच्या काळात प्रतिष्ठीत शोध पत्रिकेत किमान एक शोध निबंध प्रसिद्ध झालेला असावा. वेळोवेळी या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अवलोकन केले जाणार आहे.

या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर वर्गांना शिकविणे गरजेचे राहील. कुलगुरु प्रा. माहेश्‍वरी यांच्या कल्पनेतून ही योजना साकारली असून, यासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात २० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

SCROLL FOR NEXT